T20 World Cup: टीम इंडियाचा 'दुसरा झहीर खान' कोण?, पाकिस्तानचा कामरान म्हणतो...

T20 World Cup आधी पाकिस्तानी खेळाडूने केलं भारतीय बॉलरचं कौतुक

Updated: Oct 1, 2022, 05:20 PM IST
T20 World Cup: टीम इंडियाचा 'दुसरा झहीर खान' कोण?, पाकिस्तानचा कामरान म्हणतो... title=

Arshdeep Singh: सध्या सुरू असलेल्या भारत विरुद्ध साऊथ अफ्रिका  (INDvsSA) मालिकेतील पहिला सामना भारताने जिंकला. भारताचा युवा गोलंदाज अर्शदीप सिंह याने धारदार गोलंदाजी करत साऊथ अफ्रिकन फलंदाजांच्या दांड्या गुल केल्या. अर्शदीपने पहिल्याच ओव्हरमध्ये 3 विकेट घेत साऊथ अफ्रिकेची बॅटिंग ऑर्डर मोडीस काढली. याचा फायदा भारताला आगामी T20 World Cup मध्ये फायदा होणार आहे. त्यामुळे अर्शदीप (Arshdeep Singh) चांगलाच चर्चेत आला आहे. (kamran akmal former pakistan cricketer compare arshdeep-singh with zaheer khan before t20 world cup

पाकिस्तानच्या माजी क्रिकेटरने भारतीय गोलंदाज अर्शदीप सिंह याचं तोंडभरून कौतूक केलं आहे. टीम इंडियाला दुसरा झहीर खान (Zahir khan) मिळालाय, असं म्हणत पाकिस्तानचा माजी खेळाडू कामरान अकमल म्हणाला आहे. टीम इंडियाच्या (Team India) गोलंदाजीवर बोलताना कामरान अकमलने (Kamran Akmal) अर्शदीपचं तोंडभरून कौतूक केलंय.

नेमकं काय म्हणाला Kamran Akmal ?

अर्शदीप सिंह (Arshdeep Singh Bowling) हा अतुलनीय गोलंदाज आहे. माझ्या मते भारतीय संघाला आणखी एक झहीर खान सापडला आहे. त्याच्याकडे वेगवान आणि स्विंग बॉलिंगचा मारा आहे. त्याचबरोबर तो मानसिकदृष्या देखील सक्षम आहे. परिस्थितीनुसार तो योग्य गोलंदाजी करू शकतो, असं देखील कामरान अकमल म्हणाला आहे.

दरम्यान, कोणत्या फलंदाजाविरुद्ध कशी गोलंदाजी करायची याचा सराव त्याने योग्य प्रकारे केला आहे. त्यानुसार तो मैदानावर कमाल दाखवतो. त्याच्या गोलंदाजीमध्ये परिपक्वता आहे. झहीर खाननंतर टीम इंडियामध्ये जी जागा होती, ती आता अर्शदीप सारख्या डावखुऱ्या गोलंदाजामुळे पुर्ण होणार आहे.

T20 World Cup नंतर Team India तून 'हा' खेळाडू घेणार निवृत्ती!