धोनीला पाणी देतानाचा झिवाचा फोटो व्हायरल

मुंबईच्या अंधेरी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये क्रिकेट आणि मनोरंजन विश्वातील स्टार्स यांच्यात फुटबॉलचा सामना रंगला होता. क्रिकेटप्रमाणेच येथेही धोनीने दोन गोल करताना संघाला शानदार विजय मिळवून दिला. 

Updated: Oct 16, 2017, 05:16 PM IST
धोनीला पाणी देतानाचा झिवाचा फोटो व्हायरल title=

मुंबई : मुंबईच्या अंधेरी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये क्रिकेट आणि मनोरंजन विश्वातील स्टार्स यांच्यात फुटबॉलचा सामना रंगला होता. क्रिकेटप्रमाणेच येथेही धोनीने दोन गोल करताना संघाला शानदार विजय मिळवून दिला. 

या सामन्यात धोनीच्या खेळाने तेथील प्रेक्षकांची मने जिंकली. मात्र त्याबरोबरच या सामन्यानंतरचा धोनीसोबतचा झिवाचा फोटोही व्हायरल झाला. सामना संपल्यानंतरचा धोनीचा एक व्हिडीओ समोर आलाय यात धोनीची मुलगी त्याला पाण्याची बाटली द्यायला मैदानात जाते. यादरम्यान धोनीला पाणी पाजत असल्याचा फोटो क्लिक करण्यात आला. 

हा फोटो व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी हा या वर्षातील सर्वात सुंदर क्षण असल्याचे म्हटलेय. काही दिवसांपूर्वीच धोनी आणि झिवाचा बेसनचा लाडू खातानाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता.