न्यूझीलंड : आयसीसी वुमन्स वर्ल्डकपमध्ये आज भारत विरूद्ध इंग्लंड सामना खेळला गेला. यामध्ये इंग्लंडने भारताचा दारूण पराभव केला. मात्र या सामन्यात भारताची धडाकेबाज गोलंदाज झुलन गोस्वामीने इतिहास रचला आहे. वनडे क्रिकेटमध्ये 250 विकेट्स पूर्ण करणारी झुलन पहिला महिला क्रिकेटर ठरली आहे. झुलनने टॅमी ब्यूमोंट हिची विकेट घेत हा इतिहास रचला आहे.
या सामन्यात टीम इंडियाच्या महिलांनी गतविजेत्या इंग्लंड टीमला अवघ्या 135 रन्सचं आव्हान दिलं होतं. इंग्लंडच्या महिला टीमने 6 विकेट्स गमावत हे लक्ष्य पूर्ण केलं आहे. तर यावेळी झुलनने वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेण्याचा विक्रम रचला आहे.
Jhulan Goswami now has 250 wickets in ODIs
What a player!#CWC22 pic.twitter.com/0bLllvlUbg
— ICC (@ICC) March 16, 2022
चकदा एक्सप्रेस नावाने प्रसिद्ध असलेली झुलन गोस्वामीने यापूर्वीच महिला वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक विकेट घेण्याचा रेकॉर्डही आपल्या नावे केला आहे. तिने यामध्ये ऑस्ट्रेलियाच्या माजी खेळाडू लिन फुलस्टन यांना मागे टाकलं होतं. झुलनच्या नावे वर्ल्डकपमध्ये 41 विकेट्स आहेत.