Jaydev Unadkat in Indian ODI Team: 19 फेब्रुवारी रोजी टीम इंडियाने (Team India) दिल्लीत खेळल्या गेलेल्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीच्या (Border-Gavaskar Trophy) दुसऱ्या टेस्ट सामन्यामध्ये ऑस्ट्रेलियाचा पराभव केला. या विजयासह भारताने सिरीजमध्ये अभेद्य आघाडी घेतलीये. ही टेस्ट सिरीज संपल्यानंतर दोन्ही टीम्समध्ये 3 सामन्यांची वनडे सिरीजही (ODI series) खेळवली जाणार आहे. ज्यासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच BCCI ने टीम्सची घोषणा (India squads for ODI series) केलीये. दरम्यान या सामन्यामध्ये तब्बल 10 वर्षांनी वनडे सामन्यात एन्ट्री होणार आहे.
टीम इंडियाचा खेळाडू जयदेव उनाडकटचा (Jaydev Unadkat) यंदा तब्बल 10 वर्षांनंतर भारतीय वनडे टीममध्ये समावेश करण्यात आला आहे. जयदेव उनाडकटने 2013 साली वनडे क्रिकेटमध्ये डेब्यू केलं होतं. मात्र, या फॉरमॅटमध्ये त्याने शेवटचा सामना देखील 2013 मध्येच खेळला होता. 21 नोव्हेंबर 2013 रोजी कोचीमध्ये त्याने वेस्ट इंडिजविरुद्ध शेवटची वनडे खेळली होती. त्यानंतर आता 2023 मध्ये ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या सामन्यामध्ये त्याचा समावेश करण्यात आला आहे.
सौराष्ट्रचा 31 वर्षीय वेगवान गोलंदाज जयदेव उनाडकटला वनडे टीममध्ये स्थान देण्यात आलंय. नुकतंच त्याला कसोटी टेस्टमध्येही स्थान देण्यात आलं होतं. जयदेवने 2010 मध्ये टेस्ट क्रिकेटमध्ये पदार्पण केलं पण त्यानंतर त्याला तब्बल 12 वर्षांनी टेस्ट टीममध्ये स्थान मिळालंय.
बीसीसीआयकडून घोषणा करण्यात आल्यानुसार, केवळ पहिल्या सामन्यासाठी नियमित कर्णधार रोहित शर्मा अनुपस्थितीत असणार आहे. त्यामुळे त्याच्या जागी टीमच्या कर्णधारपदाची धुरा हार्दिक पंड्याकडे सोपण्यात आली आहे. मात्र दुसऱ्या आणि तिसऱ्या वनडे सामन्यासाठी रोहित शर्माच टीमचं नेतृत्व करताना दिसणार आहे.
बीसीसीआयने दिलेल्या माहितीनुसार, कर्णधार रोहित शर्मा वैयक्तिक कारणांमुळे पहिल्या वनडेसाठी उपस्थित राहू शकणार नाही. रोहितने श्रीलंकेविरुद्धच्या शेवटच्या सिरीजमध्ये उत्तम खेळ करत शतक झळकावलं होतं. त्यामुळे टीम इंडियाला त्याची उणीव भासू शकते.
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, केएल राहुल, ईशान किशन (विकेटकीपर), हार्दिक पांड्या (उपकर्णधार), आर जडेजा, कुलदीप यादव, वाशिंगटन सुंदर, युजवेन्द्र चहल, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज , उमरान मलिक, शार्दुल ठाकुर, अक्षर पटेल, जयदेव उनादकट