Virat Kohli च्या पार्सलमध्ये छोले भटुरे नव्हते; कोच राहुल द्रविड यांनी केला खुलासा

कोहली आणि राहुलच्या या व्हिडिओनंतर एक अशी अफवा पसरली की, कोहलीने खास जेवणासाठी छोले भटुरे (chhole bhature) मागवले होते. मात्र विराट कोहलीसाठी आलेल्या या पार्सलमध्ये छोले भटुरे नव्हते, असा खुलासा टीम इंडियाचे कोच राहुल द्रविड यांनी केला आहे. 

Updated: Feb 20, 2023, 12:18 AM IST
Virat Kohli च्या पार्सलमध्ये छोले भटुरे नव्हते; कोच राहुल द्रविड यांनी केला खुलासा title=

Virat Kohli chhole bhature : भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यात दिल्लीत खेळल्या गेलेल्या दुसऱ्या टेस्टच्या दुसऱ्या दिवशी लंचच्या वेळी विराट कोहली (Virat Kohli) आणि राहुल द्रविडचा (Rahul dravid) एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय. या व्हिडिओमध्ये एक सपोर्ट स्टाफ येतो आणि विराट कोहलीला जेवण आलं असल्याचं सांगताना दिसतोय. दरम्यान जेवण पाहून विराट कोहलीही खूप खूश असल्याचं या व्हिडीओमध्ये कैद झालं आहे. कोहली आणि राहुलचा हा व्हिडिओ शनिवारी सोशल मीडियावर सगळीकडे दिसत होता. मात्र याबाबतच टीम इंडियाचे कोच राहुल द्रविड यांनी मोठा खुलासा केला आहे. 

'पार्सलमध्ये चोले भटुरे नव्हते' 

कोहली आणि राहुलच्या या व्हिडिओनंतर एक अशी अफवा पसरली की, कोहलीने खास जेवणासाठी छोले भटुरे (chhole bhature) मागवले होते. त्यामुळे जेव्हा सपोर्ट स्टाफने जेवण तयार असल्याचं सांगितले तेव्हा कोहली खूप खूश दिसला. मात्र विराट कोहलीसाठी आलेल्या या पार्सलमध्ये छोले भटुरे नव्हते, असा खुलासा टीम इंडियाचे कोच राहुल द्रविड यांनी केला आहे. 

ऑर्डर दिल्यानंतर कोहलीने त्याच्या आवडत्या दुकानातून छोले भटुरे खाल्ल्याची सोशल मीडियावर चर्चा आहे. पण टीम इंडियाचे प्रमुख कोच राहुल द्रविड यांनी त्या पॅकेटमध्ये नेमकं काय होतं, याचा खुलासा केलाय. विराट कोहलीला जे पार्सल देण्यात आलं त्यात छोले भटुरे नसून चोले कुलचे असल्याचं, राहुल द्रविडने यांनी सांगितलं.

राहुल द्रविड म्हणाले, मी 50 वर्षांचा आहे त्यामुळे इतक्या प्रमाणात असलेलं कोलेस्ट्रॉलयुक्त खाणं मी खाऊ शकत नाही. 

Virat Kohli च्या विकेटवरून झालेला वाद

थर्ड अंपायर रिचर्ड इलिंगवर्थ यांनी दिलेल्या निर्णयावरून हा वाद निर्माण झाला आहे. टीम इंडियाच्या पहिल्या डावात ही घटना घडली. टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहलीला (Virat Kohli) ऑस्ट्रेलियाच्या मॅथ्यू कुहनेमनच्या एका बॉलवर पहिल्या मैदानी अंपयारने एलबीडब्ल्यू आऊट दिलं. यावेळी विराटने (Virat Kohli) रिव्ह्यू घेतला. त्यावेळेस थर्ड अंपायर रिचर्ड इलिंगवर्थ (Richard Illingworth) यांनी त्याला आऊट घोषित केलं. रिचर्ड इलिंगवर्थ यांनी दिलेल्या निर्णयावरून हा वाद निर्माण झाला आहे.