मुंबई : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टेस्ट सीरिजआधी टीम इंडियाला मोठा धक्का लागला आहे. फास्ट बॉलर जसप्रीत बुमराह दुखापतीमुळे टेस्ट सीरिजला मुकणार आहे. बुमराहच्या कंबरेला फ्रॅक्चर झाल्यामुळे बुमराह ही सीरिज खेळू शकणार नाही. बुमराहच्याऐवजी टीममध्ये उमेश यादवची निवड करण्यात आली आहे. २ ऑक्टोबरपासून ३ टेस्ट मॅचच्या या सीरिजला सुरुवात होणार आहे.
२५ वर्षांच्या जसप्रीत बुमराहने १२ टेस्ट, ५८ वनडे आणि ४२ टी-२० मॅच खेळल्या आहेत. बुमराहने १२ टेस्टमध्ये ६२ विकेट घेतल्या आहेत. बुमराहने खेळलेल्या सगळ्या टेस्ट मॅच या भारताबाहेरच्या आहेत. उमेश यादवने ४१ टेस्टमध्ये ११९ विकेट घेतल्या आहेत. ३१ वर्षांच्या उमेश यादवने ७५ वनडे आणि ७ टी-२० मॅचही खेळल्या आहेत.
'जसप्रीत बुमराहला भारतात होणाऱ्या टेस्ट मॅचसाठी आराम दिला पाहिजे. बुमराहसारख्या प्रतिभावान खेळाडूची कारकिर्द खराब केली जाऊ नये. भारतातल्या कठीण खेळपट्ट्यांवर बुमराहला खेळवायची गरज नाही,' अशी प्रतिक्रिया माजी बॉलर चेतन शर्मा यांनी दिली आहे.
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातली पहिली टेस्ट २ ऑक्टोबरपासून विशाखापट्टणममध्ये, दुसरी टेस्ट मॅच रांचीमध्ये आणि तिसरी पुण्यात खेळवली जाणार आहे.
विराट कोहली, मयंक अग्रवाल, रोहित शर्मा, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, हनुमा विहारी, ऋषभ पंत, ऋद्धीमान सहा, आर. अश्विन, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, उमेश यादव, इशांत शर्मा, शुभमन गिल