नवी दिल्ली : नवी दिल्ली क्रिकेट संघाचा कॅप्टन ईशांत शर्मा टाचेच्या दुखापतीमुळे १७ डिसेंबरला पुण्यात होणाऱ्या रणजी सेमी फायनल खेळणार नाहीए. बंगाल विरूद्ध दिल्ली असा हा सेमी फायनलचा सामना होणार आहे.
श्रीलंकेविरूद्धधच्या शेवटच्या टेस्टमध्ये त्याच्या टाचेला दुखापत झाली होती. साऊथ आफ्रिका दौऱ्याआधी या दुखापतीतून सावरणे गरजेचे आहे.
नाहीतर याचा परिणाम खेळावर होण्याचीही शक्यता आहे.
'इशांतच्या टाचेला दुखापत झाल्याने याचा परिणाम साऊथ आफ्रिका दौऱ्यावर होऊ नये असे त्याला वाटते, त्यामूळे ईशांतने विश्रांती घेतली आहे.
त्याला न घेताच दिल्लीची टीम पुण्यात पोहोचल्याचे'दिल्ली टीम कमिटी सदस्याने सांगितले.
बीसीसीआयने नियमित टेस्ट क्रिकेटर्सना आपल्या राज्यासाठी रणजी खेळण्याची परवानगी दिली आहे. इंशातच्या गैरहजेरीत रिषभ पंत दिल्ली टीमचे नेतृत्व करेल.
भारतीय टीम २७ डिसेंबरला साऊथ आफ्रिकेसाठी रवाना होईल. तीन टेस्ट मॅचची सिरीज खेळवली जाणार आहे.
इशांत या टीमचा हिस्सा आहे. त्याआधी इशांतला या दुखापतीतून बाहेर यावे लागणार आहे.
इशांतने ११६ फर्स्ट क्लास मॅचमध्ये ३६६ विकेट घेतले आहेत. त्याने ७९ टेस्ट मॅचमध्ये २२६ विकेट घेतल्या आहेत.