GT vs DC : अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये आज गुजरात टायटन्स (Gujarat Titans) विरूद्ध दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) यांच्यात सामना रंगला होता. या सामन्यात अगदी शेवटच्या क्षणी दिल्ली कॅपिटल्सने बाजी मारली. दिल्लीने गुजरातचा 5 रन्सने (Delhi Capitals win) पराभव केला आहे. मुख्य म्हणजे कर्णधार हार्दिक पंड्या क्रिजवर असतानाही गुजरातला पराभवाचा सामना करावा लागला. यावेळी पॉईंट्स टेबलमध्ये तळाला असलेल्या दिल्लीने टॉपला असलेल्या गुजरातचा (Gujarat Titans) पराभवाची धूळ चारलीये.
दिल्ली कॅपिटल्सने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. हा निर्णय टीमसाठी काही जास्त फायदेशीर ठरला नाही. दिल्लीची ओपनिंग जोडी आजच्या सामन्यात देखील फेल झाली. दिल्लीकडून एकट्या अमन खानने चांगली खेळी केली. त्याने 44 बॉल्समध्ये 51 रन्सची खेळी केली. यावेळी त्याने 3 सिक्स आणि 3 फोर लगावले.
याशिवाय अक्षर पटेल 27 तर रिपल पटेल 23 रन्स करून माघारी परतले. 20 ओव्हर्समध्ये दिल्लीच्या टीमने 130 रन्स केले. आणि गुजरातच्या टीमला 131 रन्सचं जिंकण्यासाठी आव्हान दिलं.
दिल्लीने दिलेल्या 131 रन्सच्या लक्ष्याचा पाठलाग करताना गुजरातची सुरुवात खराब झाली. साहा 0 आणि गिल अवघ्या 6 रन्स करून बाद झाले. विजय शंकरलाही आज कमाल दाखवता आली नाही. अखेरी कर्णधार हार्दिक पंड्याने मैदानावर येत अर्धशतक झळकावलं. त्याने 53 बॉल्समध्ये 59 रन्स केले. दुसरीकडे तेवातियाने मोठे शॉट्स खेळू जिंकवून देण्याता प्रयत्न केला. मात्र तो 20 रन्स करून बाद झाला.
गुजरात टायटन्स: ऋद्धिमान साहा (विकेटकीपर), अभिनव मनोहर, हार्दिक पांड्या (कर्णधार), विजय शंकर, डेविड मिलर, राहुल तेवतिया, राशिद खान, नूर अहमद, मोहम्मद शमी, मोहित शर्मा, जोशुआ लिटिल
दिल्ली कॅपिटल्स : डेविड वॉर्नर (कर्णधार), फिलिप सॉल्ट (विकेटकीपर), मनीष पांडे, राइली रूसो, प्रियम गर्ग, अक्षर पटेल, रिपल पटेल, अमन हकीम खान, कुलदीप यादव, एनरिक नॉर्त्जे, ईशांत शर्मा