हार्दिक पांड्या करतोय 'या' अभिनेत्रीला डेट? जवळच्या व्यक्तीने केला मोठा खुलासा!

Hardik-Ananya Dating Rumors : घटस्फोटानंतर हार्दिक पांड्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. अशातच आता हार्दिक पांड्या अभिनेत्री अनन्या पांडेसोबत डेट करत असल्याची चर्चा होत आहे.

सौरभ तळेकर | Updated: Jul 25, 2024, 07:19 PM IST
हार्दिक पांड्या करतोय 'या' अभिनेत्रीला डेट? जवळच्या व्यक्तीने केला मोठा खुलासा! title=
Hardik Pandya Dating Ananya Panday Rumors

Hardik Pandya Ananya Panday Rumors : टीम इंडियाचा स्टार ऑलराऊंडर हार्दिक पांड्या (Hardik Pandya) गेल्या काही दिवसांपासून चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. हार्दिक पांड्याने आपल्या भेदक कामगिरीच्या जोरावर टीम इंडियाला टी-ट्वेंटी वर्ल्ड कप जिंकवून दिला. मात्र, त्यानंतर हार्दिक खासगी आयुष्यामुळे चर्चेत आला. हार्दिक आणि नताशा स्टेनकोविक यांनी घटस्फोट जाहीर केला अन् क्रिडाविश्वात खळबळ उडवून दिली. हार्दिक पांड्याने त्याच्या सोशल मीडियावरून अधिकृतरित्या याची घोषणा केली होती. हार्दिकच्या घटस्फोटानंतर आता तो एका अभिनेत्रीला डेट करत असल्याची चर्चा सुरू आहे. ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून अनन्या पांडे (Ananya Panday) आहे.

अभिनेते चंकी पांडे यांची मुलगी अनन्या पांडे हार्दिकला डेट करतीये का? असा सवाल विचारला जात असतानाच आता एका जवळच्या व्यक्तीने मोठा खुलासा केला आहे. काही दिवसांपूर्वी अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नसोहळ्यात हार्दिक आणि अनन्या एकमेकांसोबत डान्स करताना दिसले होते. त्यामुळे दोघांच्या रिलेशनशीपविषयी अनेक चर्चा होत होत्या. अशातच आता खरी बाजू समोर आली आहे. 

बॉलीवुड लाइफशी बोलताना अनन्या पांडेच्या जवळच्या व्यक्तीने वृत्त फेटाळून लावलं आहे. नाव न घेण्याच्या अटीवर, हार्दिक आणि अनन्या यांच्यात असं काहीच नसल्याचं सांगितलं. अनन्या पांडे थोडीशी मनमिळावू स्वभावाची आहे. त्यामुळे ती कुठेही मिसळून जाते. हार्दिकसोबत तिचं काहीही अफेर नाहीये. अनन्या पांडे सध्या तिच्या करियरविषयी खूप सिरीयस आहे आणि तिला आता तिच्या कामावर फोकस करायचा आहे. तिच्याकडे सध्या खूप चांगले चित्रपट आणि ओटीटी प्रोजेक्ट्स आहेत. ती आपला संपूर्ण वेळ तिथं घालवते, असा खुलासा देखील केला आहे.

हार्दिक पांड्या माझं प्रेरणास्थान, या स्टार ऑलराऊंडरचा खुलासा

दरम्यान, गेल्या 4 वर्षे एकत्र राहिल्यानंतर, नताशा आणि मी एकमेकांपासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे, असं म्हणत हार्दिक पांड्याने नताशा स्टॅनकोविक पासून घटस्फोट जाहीर केला होता. नताशासोबत मुलगा अगस्त्य देखील सर्बियाला गेला आहे. अशातच नताशाने इंस्टाग्राम अकाउंटवरून काही फोटो आणि व्हिडीओ शेअर केले होते. त्यावर हार्दिक पांड्याने कमेंट देखील केली होती.