Sunil Gavaskar Statement: काही दिवसांपूर्वी मुंबई इंडियन्सच्या ( Mumbai Indians ) मॅनेजनेंटने मोठा निर्णय घेतला. यावेळी टीम इंडिया कर्णधारपदी रोहित शर्माला हटवून हार्दिक पंड्याकडे ( Hardik Pandya ) नेतृत्व सोपवण्यात आलं. यानंतर मुंबई इंडियन्सच्या ( Mumbai Indians ) चाहत्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी दिसून आली. दरम्यान याबाबत आता टीम इंडियाचे माजी क्रिकेटर सुनील गावस्कर यांनी विधान केलं आहे.
टीम इंडियाचा माजी कर्णधार आणि अनुभवी टेस्ट ओपनर फलंदाज सुनील गावस्कर यांनी रोहित शर्माच्या जागी हार्दिक पांड्याला ( Hardik Pandya ) मुंबई इंडियन्सचा कर्णधार बनवण्याबाबत वक्तव्य केलंय. हार्दिक पांड्या कर्णधार झाल्यामुळे मुंबई इंडियन्सला ( Mumbai Indians ) फायदा होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. गावस्कर यांच्या म्हणण्यानुसार, या बदलामुळे रोहित शर्माच्या खांद्यावरील कर्णधारपदाचं ओझं कमी होणार आहे.
हार्दिकच्या कर्णधारपदावर गावस्कर म्हणाले, 'हार्दिकला ( Hardik Pandya ) कर्णधारपदी नियुक्त केल्यानंतर न केवळ मुंबई इंडियन्सला ( Mumbai Indians ) फायदा होणार आहे तर रोहित शर्मालाही याचा फायदा होईल. यावेळी रोहितला वरच्या फळीत टेन्शन फ्री फलंदाजी करण्याचं स्वातंत्र्य मिळणार आहे. हार्दिक तिसऱ्या किंवा पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला येऊन मदत करू शकतो. मुंबई इंडियन्सला ( Mumbai Indians ) सलग 200 हून अधिक रन्स करण्यात यश मिळू शकते.
नोव्हेंबर 2023 मध्ये हार्दिक मुंबई इंडियन्समध्ये ( Mumbai Indians ) परतला होता. गुजरात टायटन्सकडून ट्रेडिंग विंडोदरम्यान मुंबईने त्याला करारबद्ध केलं. IPL 2024 च्या लिलावाच्या अवघ्या 4 दिवस आधी मुंबईने हार्दिकची ( Hardik Pandya ) मुंबईचा ( Mumbai Indians ) कर्णधार म्हणून घोषणा केली. यामुळे मुंबईचे चाहते मात्र नाराज झाले.
मुंबई इंडियन्सची ( Mumbai Indians ) टीम आतापर्यंत 5 वेळा आयपीएल चॅम्पियन बनलीये. यावेळी रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीमला ही कामगिरी करता आली. त्यानंतर धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्ज, 5 वेळा आयपीएल विजेतेपद जिंकणारा दुसरी टीम बनली. तर हार्दिक पांड्याने ( Hardik Pandya ) गुजरात टायटन्सचे दोन सिझनसाठी नेतृत्व केलं आणि टीमला एकदा चॅम्पियन बनवलं.