वेस्ट इंडिजच्या कॅम्पबेल-होपची विक्रमी पार्टनरशीप!

वेस्टइंडिजने आयर्लंडचा १९६ रनने पराभव केला.

Updated: May 6, 2019, 04:34 PM IST
वेस्ट इंडिजच्या कॅम्पबेल-होपची विक्रमी पार्टनरशीप! title=

डबलिन : वेस्ट इंडिज बांग्लादेश आणि आयर्लंड यांच्यातील ट्रॅन्ग्यूलर सीरिजच्या पहिल्याच मॅचमध्ये वेस्ट इंडिजच्या ओपनरनी विश्वविक्रमाला गवसणी घातली. या मॅचमध्ये आयर्लंडने टॉस जिंकून वेस्ट इंडिजला पहिले बॅटिंगला बोलावलं. यानंतर ओपनिंगला आलेल्या शाय होप आणि जॉन कॅम्पबेल यांनी तब्बल ३६५ रनची पार्टनरशीप केली. याचबरोबर दोघांनी सर्वाधिक ओपनिंग पार्टनरशीपचा पाकिस्तानचा रेकॉर्ड मोडित काढला. याआधी पाकिस्तानचे ओपनर इमाम उल हक-फखर झमन यांनी झिमबाब्वेविरुद्ध ३०४ रनची पार्टनरशीप केली होती. 

वेस्टइंडिजची पहिली विकेट ४८ व्या ओव्हरच्या २ ऱ्या बॉलवर गेली. बॅरी मॅक कॅर्थीने जॉन कॅम्पबेलला कॅचआऊट केले. जॉन कॅम्पबेल १३७ बॉलमध्ये १७९ दमदार खेळी केली. यासोबतच जॉन कॅम्पबेलचे वनडेमधील हे पहिलेच शतक ठरले. यात त्याने १५ फोर आणि ६ सिक्स ठोकले. कॅम्पबेल आऊट झाल्यानंतर याच ओव्हरच्या ५ व्या बॉलवर शाई होप सुद्धा आऊट झाला. शाय होपने १७० रनची खेळी केली, यात त्याने २२ फोर आणि २ सिक्स ठोकले. शाय होपचं वनडेमधलं हे पाचवं शतक होतं. 

रेकॉर्ड कामगिरी

जॉन कॅम्पबेल आणि शाई होप या जोडीने रेकॉर्ड पार्टनरशीपसोबत आणखी रेकॉर्ड झाले आहेत. वनडे इतिहासात सलामीच्या दोन्ही खेळाडूंनी १५० पेक्षा अधिक रन करण्याची ही पहिलीच वेळ आहे. वेस्ट इंडिज कडून खेळताना दोन्ही ओपनरनी १०० किंवा त्यापेक्षा अधिक रन करण्याची ही पहिलीच घटना.

या मॅचमध्ये वेस्ट इंडिजने आयर्लंडला विजयासाठी ३८२ रनचं आव्हान दिलं होतं. या आव्हानाचा पाठलाग करताना आयर्लंडला ५० ओव्हरही खेळता आल्या नाहीत. ३४.४ ओव्हरमध्ये १८५ रनवर आयर्लंडचा डाव आटोपला. आयर्लंडकडून केविन ओब्रायनने सर्वाधिक ६८ रन केल्या. केविनचा अपवाद वगळता कोणत्याच खेळाडूला चांगली खेळ करता आली नाही. वेस्टइंडिजने आयर्लंडचा १९६ रनने पराभव केला. 

पहिल्या विकेटसाठी सर्वाधिक पार्टनरशीप

खेळाडू

टीम

रन

विरुद्ध टीम

वर्ष

जॉन कॅम्पबेल-शाई होप वेस्ट इंडिज ३६५ रन आयर्लंड २०१९
इमाम उल हक-फकर झमान पाकिस्तान ३०४ रन झिम्बाब्वे २०१८
उपुल थरंगा-सनथ जयसूर्या श्रीलंका  २८६ रन इंग्लंड २००६
डेव्हिड वॉर्नर-ट्रेव्हिस हेड ऑस्ट्रेलिया २८४ रन पाकिस्तान २०१७
क्विंटन डिकॉक-हाशीम आमला दक्षिण आफ्रिका २८२ रन बांगलादेश २०१७