IPL 2024: 22 मार्चपासून रंगणार IPL चा महासंग्राम; कुठे पाहता येणार मोफत सामने?

IPL 2024 Free Live Streaming: आयपीएलचे ( IPL 2024 ) सामने यंदाही फ्री पाहता येणार आहेत. यावेळी IPL सामना Jio सिनेमावर दाखवला जाणार आहे. जिओ सिनेमा यासाठी चाहत्यांकडून एक रुपयाही आकारणार नाही. 

सुरभि जगदीश | Updated: Mar 15, 2024, 02:56 PM IST
IPL 2024: 22 मार्चपासून रंगणार IPL चा महासंग्राम; कुठे पाहता येणार मोफत सामने? title=

IPL 2024 Free Live Streaming: येत्या 22 मार्चपासून आयपीएलच्या 17 व्या सिझनला सुरुवात होणार आहे. यंदाच्या आयपीएलपूर्वी ( IPL 2024 ) टीममध्ये अनेक बदल झाले आहेत. या सिझनमध्ये पहिला सामना चेन्नई सुपर किंग्ज विरूद्ध रॉयल चॅलेंजर बंगळूरू ( Royal Challengers Bangalore ) यांच्यामध्ये रंगणार आहे. चेन्नई सुपर किंग्ज ( Chennai Super Kings ) गेल्या सिझनमधील विजेती आहे. 17 व्या सिझनला आता अवघे काही दिवस उरले असून सामने कुठे पाहता येणार हा प्रश्न सर्वांच्या समोर आहे. 

आयपीएलचे सामने फ्री कुठे पाहता येणार?

आयपीएलचे ( IPL 2024 ) सामने यंदाही फ्री पाहता येणार आहेत. यावेळी IPL सामना Jio सिनेमावर दाखवला जाणार आहे. जिओ सिनेमा यासाठी चाहत्यांकडून एक रुपयाही आकारणार नाही. चाहत्यांना सर्व सामने फ्री ऑनलाइन पाहता येणार आहेत. जिओ सिनेमाने याबाबतची माहिती सोशल मीडियावर शेअर केली आहे. या सिझनमधील पहिला सामना धोनी आणि कोहली यांच्यात होणार आहे. 

टीव्हीवर कुठे पाहू शकता आयपीएलचे सामने?

तुम्हाला आयपीएल ( IPL 2024 ) टीव्हीवर पाहायची असेल तर तुम्ही ते स्टार स्पोर्ट्सवर पाहू शकता. यावेळी आयपीएलची कॉमेंट्री  हिंदी, इंग्रजी तसेच प्रादेशिक भाषांमध्ये असणार आहे. गेल्या वेळी जिओ सिनेमाने चाहत्यांना भोजपुरी, तामिळ आणि तेलगू भाषेत कॉमेंट्रीचा पर्याय दिला होता. यंदाच्या वेळीही प्रेक्षकांना याचा अनुभव घेता येणार आहे. 

आयपीएलचं केवळ पहिल्या टप्प्याचं शेड्यूल जाहीर

येत्या काळात देशात लोकसभेच्या निवडणूकांचा रणसंग्राम रंगणार आहे. या कारणामुळे सध्या आयपीएलचं ( IPL 2024 ) केवळ पहिल्या टप्प्याचं शेड्यूल जाहीर करण्यात आलं आहे. त्यानुसार, लोकसभा निवडणुकीमुळे आयपीएलच्या केवळ 21 सामन्यांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. यामध्ये 22 मार्च रोजी सीएसके आणि आरसीबी यांच्यात पहिला सामना होणार आहे. यानंतर दुसरा सामना पंजाब किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात होणार आहे. लोकसभा निवडणूंकांच्या तारखा जाहीर झाल्यानंतर आयपीएलचं ( IPL 2024 ) पुढील टप्प्यातील शेड्यूल जाहीर होण्याची शक्यता आहे.