Shardul Thakur | 'पालघर एक्सप्रेस' सुस्साट, शार्दुल ठाकूरवर पैशांचा पाऊस

आयपीएलच्या मेगा ऑक्शनमध्ये (IPL Mega Auction 2022) मराठमोळा शार्दुल ठाकूर (Shardul Thakur) मालामाल झाला आहे.

Updated: Feb 12, 2022, 07:24 PM IST
Shardul Thakur | 'पालघर एक्सप्रेस' सुस्साट, शार्दुल ठाकूरवर पैशांचा पाऊस title=
प्रातिनिधिक छायाचित्र

बंगळुरु : आयपीएलच्या मेगा ऑक्शनमध्ये (IPL Mega Auction 2022) मराठमोळा शार्दुल ठाकूर (Shardul Thakur) मालामाल झाला आहे. शार्दुलवर पैशांचा पाऊस पडला आहे.चेन्नईकडून खेळणाऱ्या 'लॉर्ड' शार्दुलला दिल्ली कॅपिट्ल्सने (Delhi Capitals) आपल्या ताफ्यात घेतलं आहे. दिल्लीने शार्दूलसाठी तब्बल 10 कोटी 75 लाख रुपये मोजले. (ipl mega auction 2022 day 1 lord shardul thakur gose to delhi capitals for 10 crore 75 lakhs) 

शार्दूलसाठी रस्सीखेच

शार्दूलला आपल्यात घेण्यासाठी गुजरात, पंजाब, चेन्नई यांच्यात चांगलीच चुरस पाहायला मिळाली. शार्दुलसाठी या तिन्ही फ्रँचायजीत रस्सीखेच पाहायला मिळाली. मात्र अखेर दिल्लीने बाजी मारली आणि शार्दुलसाठी 10 कोटी 75 लाख रुपये मोजून त्याला आपल्याकडे ओढलं.

शार्दुलची बेस प्राईज ही 2 कोटी होती. मात्र त्याला यापेक्षा अधिक रक्कम मिळाली. शार्दुलने गेल्या काही वर्षात बॅटिंग आणि बॉलिंग या दोन्ही आघाड्यांवर धमाकेदार कामगिरी केली. 

शार्दुल निर्णायक वेळी पार्टनरशीप ब्रेक करण्यासाठी आणि फटकेबाजी करण्यासाठी ओळखला जातो. त्यामुळे चेन्नईकडून खेळणारा शार्दूल दिल्लीकडून  खेळताना आपल्या कामगिरीतून ठाकूरकी दाखवणार का, याकडे सर्वांचंच लक्ष असेल. 

शार्दूलची आयपीएलमधील कामगिरी
 
शार्दुलने आतापर्यंत आयपीएलमध्ये एकूम 61 सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने 27.87 सरासरी आणि 8.89 इकॉनॉमी रेटने 67 विकेट्स घेतल्या आहेत. शार्दुलची 19 धावा देत 3 विकेट्स ही सर्वोच्च कामगिरी राहिली आहे.  
 
ईशान किशन मालामाल 

दरम्यान इशान किशनला मुंबईने ऑक्शनमधून पुन्हा आपल्या ताफ्यात घेतलं. मुंबईने विकेटकीपर बॅट्समनसाठी 15 कोटी 25 लाख मोजले. ईशानची बेस प्राईज ही 2 कोटी होती.