IPL इतिहास या २ खेळाडूंनी २ वेळा जिंकली ऑरेंज कॅप

आयपीएलमध्ये सर्वाधिक रन करणाऱ्या खेळाडुला दिली जाते ऑरेंज कॅप

Updated: Aug 18, 2020, 08:17 PM IST
IPL इतिहास या २ खेळाडूंनी २ वेळा जिंकली ऑरेंज कॅप title=

नवी दिल्ली: आयपीएल 2020 सुरू होण्यास अजून एक महिना बाकी आहे. आयपीएलच्या सर्व संघांनीही आपली तयारी सुरू केली आहे. दरवर्षी क्रिकेट चाहत्यांनी इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) मध्ये अनेक रेकॉर्ड पाहिले. आयपीएलची ऑरेंज कॅप जिंकण्याची ओढ दरवर्षीच प्रत्येक खेळाडूमध्ये असते. आयपीएलच्या इतिहासात असे अनेक फलंदाज झाले आहेत. ज्याने एकदा नव्हे तर २ पेक्षा अधिक वेळा आयपीएलची ऑरेंज कॅप मिळवली आहे. 

डेव्हिड वॉर्नर

ऑरेंज कॅप ही आयपीएलमध्ये सर्वाधिक रन करणाऱ्या खेळाडूला दिली जाते. ऑस्ट्रेलियाचा डावखुरा स्फोटक फलंदाज डेव्हिड वॉर्नरने ऑरेंज कॅप ३ वेळा मिळवली आहे. वॉर्नर हा एकमेव खेळाडू आहे ज्याने आयपीएलच्या इतिहासात ३ वेळा ऑरेंज कॅप मिळवली आहे. डेव्हिड वॉर्नरने २०१५ मध्ये ५६२ रन, २०१७ मध्ये ६४१ रन तर २०१९ मध्ये ६९२ रन करत ऑरेंज कॅप जिंकली होती.

ख्रिस गेल

डेव्हिड वॉर्नरनंतर वेस्ट इंडीजचा फलंदाज ख्रिस गेलचे नाव या यादीत दुसर्‍या क्रमांकावर आहे. आयपीएलच्या सलग 2 हंगामात ख्रिस गेल ऑरेंज कॅप जिंकली होती. गेलने २०११ आणि २०१२ मध्ये ऑरेंज कॅप जिंकली होती. गेलने अनुक्रमे ६०८ आणि ७३३ रन केले होते.

याशिवाय ऑस्ट्रेलियाचा शॉन मार्श, मॅथ्यू हेडन, मायकेल हसी, भारताचा सचिन तेंडुलकर, रॉबिन उथप्पा, विराट कोहली आणि न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियमसन यांनी एकदा ऑरेंज कॅप जिंकली आहे.