IPL 2025 Delhi Capitals : इंडियन प्रीमिअर लीग 2025 अर्थात आयपीएलच्या मेगा ऑक्शनआधी (IPL Mega Auction) रिटेशन यादीची (Retaition List) घोषणा केली जाणार आहे. येत्या 31 ऑक्टोबरपर्यंत सर्व संघांना आपल्या रिटेन खेळाडूंची नावं जाहीर करायची आहेत. नेहमी युवा खेळाडूंवर बोली लावणाऱ्या दिल्ली कॅपिटल्सचा (Delhi Capitals) यंदाच्या हंगामातही तसाच प्लान आहे. पण कर्णधार ऋषभ पंतबाबत (Rishabh Pant) एक मोठी अपडेट समोर आली आहे. दिल्ली कॅपिटल्सच्या चाहत्यांसाठी ही बातमी धक्का देणारी आहे.
IPL 2025 आधी दिल्ली संघात खळबळ
ऋषभ पंत गेल्या काही हंगामापासून आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्सची कमान सांभाळतो. आयपीएल 2023 हंगामात पंत दुखापतीमुळे खेळू शकला नव्हता. कार अपघातामुळे पंत तब्बल एक वर्ष क्रिकेटपासून लांब होता. त्यावेळी ऑस्ट्रेलियाचा आक्रमक सलामीवीर डेव्हिड वॉर्नरने दिल्ली कॅपिटल्सचं नेतृत्व केलं होतं. आयपीएल 2024 मध्ये पंतने आयपीएलमध्ये पुनरागमन केलं आणि कर्णधारपदाची जबाबदारी सांभाळली. पण आता समोर आलेल्या माहितीनुसार आयपीएलच्या पुढच्या हंगामात ऋषभ पंत दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार नसणार अशी माहिती समोर आली आहे.
टाईम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार ऋषभ पंत दिल्ली कॅपिटल्सच्या कर्णधारपदी नसणार आहे, पंतने स्वत:हून कर्णधारपदासाठी उत्सुक नसल्याचं सांगितलं असल्याचा दावा रिपोर्टमध्ये केला आहे. कर्णधारपदावरुन पायउतार झाल्यास खेळाडू म्हणून तो संघात दिसू शकतो. आता दिल्ली फ्रँचाईज त्याला रिटेन करणार का यावर त्याचं संघातील भवितव्य अवलंबून आहे.
दिल्ली संघ सोडण्याचेही संकेत
ऋषभ पंतच्या एका पोस्टने दिल्ली संघातून बाहेर पडणार असल्याच्याही चर्चा सुरु झाल्या आहेत. पंतने सोशल मीडियावर मेगा ऑक्शनमध्ये उपलब्ध होणार असल्याचं म्हटलं होतं. आपल्या पोस्टमध्ये त्याने म्हटलं होतं 'जर मी ऑक्शनमध्ये गेलो तर माझ्यावर बोली लागेल की नाही, लागली ती किती रुपयांची असेल' असं त्याने पोस्टमधअये लिहिलं होतं. या पोस्टनंतर चाहत्याने ऋषभ पंत दिल्लीची साथ सोडणार असा अंदाज लावला जातोय. तर एका रिपोर्टममध्ये ऋषभ पंत आणि दिल्ली कॅपिटल्समध्ये सर्व काही आलबेल नसल्याचंही म्हटलं जात आहे.
आयपीएल 2021 मध्ये दिल्ली कॅपिटल्सने ऋषभ पंतची जबाबदारी सोपावली. श्रेयस अय्यर दुखापतग्रस्त झाल्याने त्याच्या जागी ऋषभ पंतला आणण्यात आलं. पण श्रेयस अय्यर संघात परतल्यानंतरही कर्णधारपद पंतकडेच ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. पण त्याच्या पुढच्याच हंगामात पंत दुखापतीमुळे आयपीएलमधून बाहेर पडला.