MS Dhoni IPL 2024 : महेंद्रसिंग धोनी याने काही दिवसांपूर्वीच आपल्या 'फेसबूक' अकाऊंटवर एक पोस्ट केली होती. त्यात धोनीने लिहीले होते की, 'नवीन मोसमात, नवीन भूमिकेसाठी प्रतीक्षा करू शकत नाही', धोनीच्या या पोस्टने क्रिकेटजगतामध्ये खळबळ उडाली होती. बरेच क्रिकेट तज्ज्ञ आणि क्रिकेट चाहत्यांनी या गोष्टीचा संबंध धोनीच्या कॅप्टन्सी आणि बॅटिंग आर्डरशी जोडला होता. काही लोकांना असेही वाटत होते की, धोनी हा कप्तानी सोडत आहे? धोनी कदाचित बॅटिंग करण्यासाठी वर येऊ शकतो? पण फेसबूकवर धोनीने नुकत्याच शेअर केलेल्या एका पोस्टमुळे लोकांची शंका दूर झालेली आहे.
आयपीएल 2024 च्या जाहिरातीसाठी धोनीने नुकताच फेसबुकवर एक व्हिडीओ शेअर केलेला आहे, त्यात थालाच्या नव्या भूमिकेचा खुलासा झालेला आहे. या व्हिडिओमध्ये धोनी स्वतः डबल रोलमध्ये पाहायला मिळतोय. या व्हिडीओवर धोनीचे हजारो चाहते रिअॅक्ट सूद्धा करत आहेत. या व्हिडिओमध्ये धोनी स्वतः अभिनय करताना दिसत आहे. 30 सेकंदाच्या या जाहिरातीत धोनी आजोबांची भूमिका साकारताना सूद्धा दिसत आहे.
धोनीचे चाहते या व्हिडीओवर मजेशीर कमेंट्स करत आहेत. यापूर्वीही महेंद्रसिंग धोनीने चेन्नई सुपर किंग्ससाठी अनेक जाहिराती शूट केल्या आहेत. धोनीने आयपीएलमध्ये श्रेयस अय्यर, केएल राहुल आणि ऋषभ पंत यांच्यासोबत अनेक प्रकारचे व्हिडिओ शूट केले होते.
धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्जने पाच वेळा आयपीएल विजेतेपद पटकावले आहे. गेल्या हंगामात चेन्नईने अंतिम सामन्यात गुजरातचा पराभव केला होता. आयपीएल 2023 च्या अंतिम सामन्यात गुजरातने 214 धावा केल्या पण दुर्भाग्याने पावसामुळे चेन्नईने डकवर्थ लुईस नियमाचा वापर करत हा सामना 5 विकेटने जिंकला होता.
आयपीएल 2024 चा पहिला सामना चेन्नई आणि बंगळुरू यांच्यात 22 मार्चला चेन्नईत होणार आहे. बघण्यायोग्य गोष्ट असेल की, या दोन्ही बलाढ्य संघांपैकी कोण पहिल्या सामन्यात बाजी मारणार?
आयपीएल 2024 साठी चेन्नई सुपर किंग्सचा संपूर्ण संघ : एमएस धोनी (कर्णधार, विकेटकीपर), मोईन अली, दीपक चहर, डेव्हॉन कॉनवे, तुषार देशपांडे, शिवम दुबे, ऋतुराज गायकवाड, राजवर्धन हंगरकर, रवींद्र जडेजा, अजय मंडल, मुकेश चौधरी, मथिशा पाथीराना, अवनीश राव अरवेली, मिचेल, रचिन रवींद्र, अजिंक्य रहाणे, शेख रशीद, मिचेल सँटनर, सिमरजीत सिंग, निशांत सिंधू, प्रशांत सोलंकी, शार्दुल ठाकूर, समीर रिझवी, मुस्तफिजुर रहमान, महेश टेकशाना.