IPL 2024: आजपासून आयपीएलला सुरुवात होणार असून एक दिवस अगोदर चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार महेंद्र सिंग धोनीने कर्णधारपदाची धुरा ऋतुराज गायकवाडकडे सोपवली. धोनीने घेतलेल्या या अचानक निर्णयाने चाहत्यांना मात्र मोठा धक्का बसला. असं म्हटलं जातंय की, धोनीने गुरुवारी नेहमीच्या स्टाईलमध्ये ब्रेकफास्टच्या टेबलावर आपल्या टीममधील सहकाऱ्यांना आणि सपोर्ट स्टाफला आश्चर्यचकित केले. यानंतर ही बातमी चेन्नई सुपर किंग्जच्या मॅनेजमेंटला देण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार, त्या बैठकीनंतर धोनीने फ्रँचायझी मॅनेजमेंटला फोन करून ऋतुराज गायकवाडकडे कर्णधारपद सोपवण्याच्या निर्णयाची माहिती दिली होती. सीएसकेचे सीईओ काशी विश्वनाथन यांनी माहिती दिली की, गेल्या दोन वर्षांपासून मी या भूमिकेसाठी तयार होतो.
द इंडियन एक्सप्रेसने त्यांच्या आर्टिकलमध्ये नमूद केलं आहे की, तो धोनीचा उत्तराधिकारी असेल. परंतु खेळाडूच्या जवळच्या लोकांच्या मते, जेव्हा गायकवाड 3 मार्च रोजी प्री-सीझन कॅम्पमध्ये सहभागी होण्यासाठी पुण्याला रवाना झाला तेव्हा धोनीच्या निवृत्तीनंतरच त्याला पुढच्या सिझनची कमान देण्यात येईल, अशी अटकळ बांधली जात होती. जोपर्यंत तो खेळाडू म्हणून आहे तोपर्यंत धोनीला गायकवाडला या भूमिकेसाठी तयार करायचं होतं.
गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्जचा आज रॉयल चॅलेंजर बंगळूरूशी पहिला सामना रंगणार आहे. संध्याकाळी 8 वाजता आज सामना चिदंबरम स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. चेन्नईची टीम पहिल्यांदाच ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वाखाली मैदानात उतरणार आहे.
ऋतुराज गायकवाड (कर्णधार), रचिन रवींद्र, अजिंक्य रहाणे, मोईन अली, डॅरिल मिशेल, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, एमएस धोनी (विकेटकीपर), शार्दुल ठाकूर, दीपक चहर, मथिशा पथिराना.