रिंकूने विराटची बॅट तोडली! संतापून विराट म्हणाला, 'तुझ्यामुळे मला..'; रिंकू म्हटला, 'तुझी शपथ..'

IPL 2024 Virat Kohli Angry On Rinku Singh: कोलकाता आणि बंगळुरुच्या संघांदरम्यान आज सामना खेळवला जाणार असून त्याआधीच हा व्हिडीओ समोर आला आहे. सरावादरम्यान या दोघांची भेट झाली तेव्हाचा हा व्हिडीओ आहे.

स्वप्निल घंगाळे | Updated: Apr 21, 2024, 11:56 AM IST
रिंकूने विराटची बॅट तोडली! संतापून विराट म्हणाला, 'तुझ्यामुळे मला..'; रिंकू म्हटला, 'तुझी शपथ..' title=
केकेआरनेच शेअर केला व्हिडीओ

IPL 2024 Virat Kohli Angry On Rinku Singh:  कोलकाता नाईड रायडर्स आणि बंगळुरु रॉयल चॅलेंजर्सच्या संघांदरम्यान इंडियन प्रिमिअर लीग 2024 च्या स्पर्धेतील 36 वा सामना आज म्हणजेच 21 तारखेला खेळवला जणार आहे. हा सामना दुपारी तीन वाजता खेळवला जाणार असून दोन्ही संघ कसून सराव करत आहेत. असं असतानाच सरावादरम्यान केकेआरचा स्फोटक फलंदाज रिंकू सिंहने आरसीबीचा स्टार फलंदाज विराट कोहलीला एक वाईट बातमी दिली आहे. यासंदर्भातील व्हिडीओ केकेआरच्या एक्स (ट्विटर) हॅण्डलवरुन पोस्ट करण्यात आला आहे. 

मैदानात सरावादरम्यान झाली दोघांची भेट

सामन्याच्या आधी संध्याकाळी मैदानामध्ये विराट आणि रिंकूची भेट झाली. या भेटीमध्ये रिंकूने विराटला, "तू मला दिलेली बॅट तुटली," असं सांगितलं. बॅट नेमकी कशी तुटली हे रिंकू विराटला समजावून सांगत असताना विराट मात्र या बातमीने थोडा निराश झाल्याचं दिसलं. रिंकू आपल्याकडून बॅट तुटली हे सांगत असतानाच विराटनेच आपण सध्या पुन्हा एखादी बॅट तुला देण्याच्या मूडमध्ये नाही, असं सांगितलं. आधीच दिलेली बॅट रिंकूने तोडल्याने विराटने पुन्हा बॅट देण्याची आपली इच्छा नसल्याचं रिंकूला थेट तोंडावरच सांगितलं.

दोघांमध्ये नेमका काय संवाद झाला ते पाहा...

रिंकू - मी फिरकी गोलंदाजाविरुद्ध खेळताना तू दिलेली बॅट तोडली.

विराट - माझी बॅट तू तोडली?

रिंकू - होय!

विराट - तू ती फिरकी गोलंदाजाविरुद्ध खेळताना तोडली? कुठे तुटली बॅट?

रिंकू - मध्यभागी

विराट - मग आता मी काय करु?

रिंकू - काही नाही मी जस्ट माहिती देत होतो.

विराट - काही हरकत नाही. तू सांगितलं हे बरं झालं पण मला माहितीची गरज नाही

त्यानंतर विराटच्या बॅटने रिंकू बॉल उडवत ती तपासून पाहू लागला. त्यावर विराटने ही बॅट चांगली नाही असं सांगितलं.

नक्की वाचा >> रोहित मुंबईच्या संघापासून एकटाच वेगळा राहतोय! खुलासा करत म्हणाला, 'मुंबईचे शेवटचे..'

विराट - ही बॅट चांगली नाही.

रिंकू- मग तू मला पाठवतोयस ना एक नवी बॅट

विराट - मी? कोणाला?

रिंकू - (विराटच्या बॅट त्याच्या हातात सोपवताना) हे घे ठेव तू!

विराट- यापूर्वी तू माझ्याकडून बॅट घेतली होती. आता तुला दुसऱ्या सामन्यासाठी माझ्याकडून दुसरी बॅट हवी आहे? तुझ्यामुळे मला नंतर या साऱ्याचे (अशा बॅट वाटत फिरण्याचे) परिणाम भोगावे लागतात.

रिंकू - तुझी शपथ घेऊन सांगतो, पुन्हा बॅट तोडणार नाही. खरंच खेळताना तुटलीय मी हवं तर दाखवतो तुला. (तोपर्यंत विराट निघून जातो.)

केकेआरने शेअर केला व्हिडीओ

'विराटभाईने एक बॅट दिया था| जो बॅट दिया खा, वो मेरे से टूट गया|' अशी कॅप्शन देत विराट आणि रिंकूमधील हा संवाद कोलकाता नाईट रायडर्सच्या हॅण्डलवरुन पोस्ट करण्यात आला आहे.

आता या व्हिडीओमध्ये विराटने रिंकूला बॅट दिली नसली तरी त्याला दिलदारपणा पाहता तो कदाचित आजच्या सामन्याआधी रिंकूला एखादी बॅट नक्कीच भेट देऊ शकतो.