Rohit Sharma Big Announcement About Dhoni: भारताचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनी सध्या इंडियन प्रिमिअर लीगच्या 17 व्या पर्वात खेळत आहे. धोनी अंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाला असला तरी तो आयपीएलमध्ये अगदी उत्तम खेळतोय असं चित्र सध्या दिसत आहे. मात्र धोनीची कामगिरी पाहून पुन्हा त्याला भारतीय संघाच्या जर्सीमध्ये पाहण्याची इच्छा अनेक चाहत्यांनी व्यक्त केली आहे. मात्र आता 2024 चा टी-20 वर्ल्डकप अगदी काही महिन्यांवर येऊन ठेपलेला आहे. अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये संयुक्तपणे जून महिन्यापासून सुरु होणाऱ्या या वर्ल्डकपमध्ये धोनी भारतीय जर्सीमध्ये दिसू शकतो अशी दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. भारताचा कर्णधार रोहित शर्मानेच यासंदर्भात सूचक विधान केलं आहे.
टी-20 वर्ल्डकपसंदर्भात आणि संघात कोणाला स्थान दिलं जाणार यासंदर्भात 'क्लब प्रेयरी फायर' नावाच्या पॉडकास्टमध्ये रोहित बोलत होता. ऑस्ट्रेलियाचा माजी विकेटकीपर अॅडम गिलक्रीस्ट, इंग्लंडचा माजी खेळाडू मायल वॉर्न सहभागी झालेल्या या पॉडकास्टमध्ये रोहित शर्माने, वेस्ट इंडिजमध्ये येण्यासाठी धोनीचं मन वळवणं कठीण आहे. मात्र तो अमेरिकेत नक्कीच असेल, असा विश्वास व्यक्त केला आहे.
गिलक्रीस्टने सध्या सुरु असलेल्या आयपीएलमधील वरिष्ठ खेळाडूंना टी-20 वर्ल्डकपसाठी टीम इंडियामध्ये जागा मिळण्यासंदर्भातील प्रश्न विचारला. यावेळेस गिलक्रीस्टने धोनी आणि दिनेश कार्तिकचा आवर्जून उल्लेख केला. "माझ्यामते वेस्ट इंडिजला येण्यासाठी धोनीचं मन वळवणं कठीण आहे. तो खरं तर दमला आहे आणि थकलाही आहे. असं असलं तरी तो अमेरिकेत नक्कीच येणार आहे. मात्र तिथे तो वेगळं काम करणार आहे. तो सध्या गोल्फमध्ये फार रस घेत आहे. त्यामुळे तिथे तो गोल्फ खेळण्यासाठी येईल असं मला वाटतं," अशी प्रतिक्रिया रोहितने नोंदवली.
नक्की वाचा >> Sixes च्या Hat-trick ची धोनीला मोजावी लागतेये मोठी किंमत? हॉटेलमधील 'त्या' Video ने वाढली चिंता
रोहित शर्माने रविवारी वानखेडेच्या मैदानावर झालेल्या चेन्नईविरुद्धच्या सामन्यातील धोनीच्या खेळीचं कौतुक केलं. धोनीने सामन्यातील शेवटच्या 4 बॉलमध्ये 3 षटकारांच्या मदतीने 20 धावा केल्या होत्या. याच धावानंतर सामन्यातील जय-पराजयातील अंतर ठरल्या. "तो चार बॉल खेळण्यासाठी आला आणि सामन्यावर मोठा प्रभाव पाडून गेला. त्याने त्या 20-22 धावा केल्या आणि नंतर त्याच सामन्याचा निकाल लागताना निर्णायक ठरल्या," असं रोहित शर्मा म्हणाला.
नक्की वाचा >> 'मला हेच कळत नाही की..'; IPL मध्ये High Scoring सामने होऊ नयेत म्हणून गंभीरचा अजब सल्ला
रोहित शर्माने बंगळुरुविरुद्धच्या सामन्यामध्ये दिनेश कार्तिकला मैदानातच चिडवताना त्याची नजर वर्ल्डकप स्कॉडवर आहे असं म्हटलं होतं. यासंदर्भात विचारलं असता रोहित शर्माने टी-20 वर्ल्डकप खेळण्यासाठी धोनीपेक्षा दिनेश कार्तिकचं मन वळवणं अधिक सोपं असल्याचं म्हटलं.