IPL 2024 RCB vs SRH: आरसीबी-हैदराबाद यांच्यात लढत; कोण जिंकणार आजचा सामना? पाहा पिच रिपोर्ट अन् हेड टू हेड रेकॉर्ड

RCB vs SRH: आयपीएलचा 30 वा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि सनरायझर्स हैदराबादच्या संघामध्ये खेळवसा जाणार आहे. आजच्या सामन्यात आरसीबीला विजय मिळवणं आवश्यक आहे. अन्यथा आरसीबी प्लेऑफमधून बाहेर पडण्याची शक्यता जास्त आहे. 

श्वेता चव्हाण | Updated: Apr 15, 2024, 12:49 PM IST
IPL 2024 RCB vs SRH: आरसीबी-हैदराबाद यांच्यात लढत; कोण जिंकणार आजचा सामना? पाहा पिच रिपोर्ट अन् हेड टू हेड रेकॉर्ड   title=

IPL 2024 RCB vs SRH head-to-head: इंडियन प्रिमीअर लीग (IPL 2024) च्या स्पर्धेमधील 30 वा सामना आज (15 एप्रिल) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि सनरायझर्स हैदराबादच्या संघादरम्यान खेळवला जाणार आहे. हा सामना बंगळुरुमधील एम. चिन्नास्वामी मैदानात रंगणार असून भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7.30 वाजता या सामन्याला सुरुवात होणार आहे.  फाफ डू प्लेसिसच्या नेतृत्वाखालील आरसीबीने 6 पैकी 1 सामने जिंकला आहे तर 5 सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे. तर दुसरीकडे सनराइजर्स हैदराबादने पाच सामन्यांपैकी 3 सामन्यात विजयी मिळवला आहे तर दोन सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. एकंदरित कोणत्याही परिस्थितीत आरसीबीला आजचा सामना जिंकावा लागेल. तर हैदाराबादचाही विजयासाठी प्रयत्न असणार आहे. मग तुम्हाला काय वाटतं आरसीबी कि हैदराबाद? कोणता संघ विजयी होणार आहे. 

हेड टू हेड आकडेवारी

आरसीबीवर सनरायझर्स हैदराबादचा वरचष्मा असून आयपीएलमध्ये आरसीबी आणि हैदराबाद यांच्यात एकूण 23 सामने खेळले गेले आहेत. त्यापैकी आरसीबीने 10 सामने जिंकले, तर सनरायझर्स हैदराबादने 12 सामने जिंकले. तर यंदाच्या आयपीएल सामन्यात गेल्या पाच सामन्यांमध्ये आरसीबीने तीन सामने जिंकले आहेत, तर सनरायझर्स हैदराबादने दोन सामने जिंकले आहेत. त्याच वेळी, चिन्नास्वामी मैदानावर दोन्ही संघांमध्ये एकूण 8 सामने खेळले गेले, ज्यामध्ये आरसीबीने 5 सामने जिंकले आणि सनरायझर्स हैदराबादने 2 सामने जिंकले.  

अशी असेल खेळपट्टी

एम चिन्नास्वामी खेळपट्टीवर दुसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करणाऱ्या संघाला या खेळपट्टीचा फायदा घेता येणार आहे. या हंगातील खेळपट्टीचा फलंदाजांना होणारा फायदा या मैदानावर झालेल्या पहिला दोन सामन्यांमधून दिसून आला आहे.  25 मार्च रोजी रॉयल्सने पंजाब किंग्जचा 19.2 षटकांत 176 धावांनी पराभव केला. आरसीबीचे 182 धावांचे आव्हान कोलकाता नाइट रायडर्सने (केकेआर) 29 मार्चला अवघ्या 16.5 षटकांत पार केले. आतापर्यंत येथे 91 आयपीएल खेळले गेले आहेत. प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघानीने जिंकलसमोर 38 तर प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघानीने जिंकलसमोर 49 धावा केल्या. 

हवामान स्थिती

बंगळुरुचे हवामान नुकतेच उष्ण असून सोमवारी बंगळुरुमध्ये पावसाची शक्यता नाही. सामन्याच्या दिवशी बहुतेकदा ढगाळ आणि खूप उष्ण असेल. तसेच तापमान 21 ते 36 अंश सेल्सिअस असणार आहे. 

आरसीबीची संभाव्य प्लेइंग इलेव्हन 

विराट कोहली, फाफ डू प्लेसिस (कर्णधार), ग्लेन मॅक्सवेल, सौरव चौहान, कॅमेरॉन ग्रीन, रजत पाटीदार, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), रीस टोपले, मयंक डागर, मोहम्मद सिराज, यश दयाल.
सबस्टीट्यूट - सुयश प्रभुदेसाई, महिपाल लोमरोर, हिमांशू शर्मा, विजयकुमार विशक, स्वप्नील सिंग

सनरायझर्स हैदराबाद संभाव्य प्लेइंग इलेव्हन

ट्रॅव्हीस हेड, अभिषेक शर्मा, अदीन मारक्रम, राहुल त्रिपाठी, हेनरीक कार्ल्सन (विकेटकीपर), अबदुल समाद, शाहबाज अहमद, पॅट कमिन्स(कर्णधार), भुवनेश्वर कुमार, जयदेव उनाडकट, टी नटराजन.
सबस्टीट्यूट - वॉशिंग्टन सुंदर, नितीश रेड्डी, ग्लेन फिलिप्स,  उमरान मलिक, मयांक मार्कंड