आयपीएल 2024 RCB vs KKR Pitch Report: इंडियन प्रिमिअर लीगमध्ये आज एक महत्त्वाचा समाना होणार आहे. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील कोलकाता नाइट रायडर्सचा संघासमोर फाफ डू प्लेसिसच्या नेतृत्वाखालील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा संघ मैदनात उतरेल. बंगळुरुमधील एम. चिन्नस्वामी स्टेडियमवर असलेला हा संघ आरसीबीसाठी होम ग्राऊण्डवरील सामना असणार आहे. आरसीबीचा हा यंदाच्या पर्वातील तिसरा सामना असणार आहे. यापैकी एक सामना आरसीबीने जिंकला असून एका सामन्यात त्यांचा पराभव झाला आहे. दुसरीकडे केकेआरच्या संघाने एकच सामना खेळला असून त्यामध्ये त्यांनी सनरायझर्स हैदराबादच्या संघाला 4 विकेट्सने पराभूत केलं. दोन्ही संघ विजयी कामगिरी करुन मैदानात उतरणार असल्याने सामना चुरशीचा होईल असं चित्र दिसत आहे. या सामन्यादरम्यान बंगळुरुमधील एम. चिन्नस्वामी स्टेडियमवरील खेळपट्टी कशी आहे आणि येथील आकडेवारी नेमकं काय सांगते पाहूयात...
बंगळुरुमधील एम. चिन्नस्वामी स्टेडियम आकाराने फार छोटं आहे. त्यामुळे या मैदानावर गोलंदाज जरा बिचकत बिचकतच गोलंदाजी करतात. दुसरीकडे हे मैदान म्हणजे फलंदाजांसाठी अगदी नंदनवन आहे. या मैदानावरील खेळपट्टी अगदीस सपाट म्हणजे फ्लॅट आहे. ही खेळपट्टी फलंदाजांसाठी फायद्याची ठरते. मात्र सामना सुरु होताना वेगवान गोलंदाजांना पहिल्या काही ओव्हरमध्ये खेळपट्टीकडून मदत मिळताना दिसते. त्यामुळेच सावध सुरुवात करणं हे फलंदाजी करणाऱ्या संघासाठी फायद्याचं ठरु शकतं. सामन्याच्या सुरुवातीलाच वेगवान गोलंदाजांना विकेट्स घेण्याची संधी असते. मात्र पॉवर प्लेपर्यंत सावधपणे ओव्हर खेळून काढल्यास फलंदाजांचं सामन्यावर वर्चस्व राहतं. मध्यम गती गोलंदाज आणि फिरकीपटू या मैदानावर फारसे प्रभावी ठरत नाहीत. मात्र वेगवान गोलंदाज अखूड टप्प्यावर किंवा यॉर्कर लेंथ गोलंदाजी करत असतील तर विकेट्स मिळण्याची शक्यात अधिक आहे.
मधल्या ओव्हर्समध्ये फिरकीपटूंना फलंदाजी करणाऱ्या संघावर दबाव बनवता आला तर त्याचा फायदाच होऊ शकतो. पण सामन्यपणे या ओव्हर्समध्ये सेट झालेले फलंदाज मोठे फटके मारताना दिसतात. केकेआर आणि आरसबीचे संघ आत्तापर्यंत एकमेकांविरुद्ध 32 सामने खेळले असून त्यापैकी 18 मध्ये केकेआरने विजय मिळवला असून 14 सामने आरसीबीने जिंकले आहेत.
नक्की वाचा >> IPL 2024 Points Table मध्ये राजस्थानचा रॉयल कारभार! मुंबईचं रँकिंग पाहून बसेल धक्का
नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी करणं फायद्याचं ठरु शकतं. प्रथम फलंदाजी करणारा संघ चेन्नस्वामीच्या मैदानावर विजय मिळवण्याचं प्रमाण 60 टक्के इतकं आहे. तर दुसऱ्यांदा फलंदाजी करणारा संघ जिंकण्याची शक्यता 40 टक्के इतकी आहे. म्हणून नाणेफेक जिंकणार कर्णधार फलंदाजीची निवड करण्याची शक्यता अधिक आहे. येथील सरासरी स्कोअर 198 धावा इतका आहे. तर दुसऱ्यांदा फलंदाजी करणाऱ्या संघाचा सरासरी स्कोअर 191 इतका असतो. त्यामुळेच आजचा सामना हाय स्कोअरिंग असणार असं चित्र दिसत आहे.
नक्की वाचा >> RCB v KKR संभाव्य Playing 11 अशी असेल? मागील 5 पैकी 4 सामने गमवाणारा RCB फेव्हरेट कारण..
सायंकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी प्रत्यक्ष खेळाला सुरुवात होईल.
नक्की पाहा >> 4, 4, 6, 4, 6, 1... शेवटच्या ओव्हरमध्ये परागची तुफान फटकेबाजी! इथेच सामना फिरला; पाहा Video
या सामन्याचं लाईव्ह प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स 1, स्टार स्पोर्ट्स 1 हिंदी बरोबरच जीओ सिनेमा अॅपवर सामना लाईव्ह पाहता येईल.