दिसते मी भारी राजा photo माझा काढ! मिस्ट्री गर्लसमोर शुभमन क्लिन बोल्ड... एक्स्प्रेशन व्हायरल

PBKS vs GT, IPL 2024 ​: देशात सध्या आयपीएलच धूम सुरु आहे.आपल्या आवडत्या खेळाडूंचा केळ पाहाण्यासाठी स्टेडिअममध्ये प्रेक्षकांची तुडुंब गर्दी होतेय. अशातच कॅमेरामनकडून स्टेडिअममधल्या एखाद्या सुंदर चेहऱ्यावर कॅमरा रोखला जातो. आणि त्या सु्ंदरीचा मिस्ट्री लिस्टमध्ये समावेश होतो.

राजीव कासले | Updated: Apr 19, 2024, 12:19 PM IST
दिसते मी भारी राजा photo माझा काढ! मिस्ट्री गर्लसमोर शुभमन क्लिन बोल्ड... एक्स्प्रेशन व्हायरल title=

Mystery Girl In IPL : इंडियन प्रीमिअर लीगच्या यंदाच्या हंगामात धावांचा पाऊस पडतोय. निर्धारीत 20 षटकात 250 धावांची अशक्य वाटणारी धावसंख्या यंदाच्या हंगामात एकादा नाही अनेकवेळा पार झालीय. सनरायजर्स हैदाराबादने (Sunrisers Hyderabad) आयपीएल इतिहासात पहिल्यांदाच 277 धावांचा डोंगर उभा केला. त्यानंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुविरोधात (RCB) 287 धावांचा विशाल स्कोर उभा केला. याशिवाय मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्सनेही 250 धावांचा टप्पा पार केलाय.

आयपीएल सामन्यांना प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद
यंदा उन्हाने 40 अंशाचा आकडा पार केला असला तरी आपल्या आवडत्या खेळाडूंचा खेळ पाहाण्यासाठी प्रेक्षक स्टेडिअममध्ये तुफान गर्दी करताना दिसातायत. अशातच कॅमेरामनकडून स्टेडिअममधल्या एखाद्या सुंदर चेहऱ्यावर कॅमरा रोखला जातो. आणि त्या सु्ंदरीचा मिस्ट्री लिस्टमध्ये (Mystery Girl) समावेश होतो. गुजरात टायटन्स विरुद्ध पंजाब किंग्सविरुद्धच्या सामन्यात अशीच एक मिस्ट्री गर्ल कॅमेरात कैद झाली आहे. पण त्याही पेक्षा त्या मिस्ट्री गर्लला पाहिल्यानंतर गुजरातचा कर्णधार शुभमन गिलच्या (Shubhaman Gill) चेहऱ्यावरची एक्स्प्रेशन पाहाण्यासारखी आहे. 

मिस्ट्री गर्ल सोशल मीडियावर व्हायरल
गुजरात टायटन्सच्या फलंदाजीदरम्यान चाहत्यांना प्रेक्षक गॅलरीत हॉलीवूड अभिनेत्री अना डे अर्मासशी मिळत्या जुळत्या चेहऱ्याची मुलगी दिसली. ही मुलगी मिस्ट्री गर्ल म्हणून सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. आयपीएल सामन्यादरम्यान जसा या मुलीच्या चेहऱ्यावर कॅमेरा रोखला गेला, तशा सर्वांच्या नजरा या मुलीवर खिळल्या. गुजरात टायटन्सचा कर्णधार शुभमन गिललाही या मिस्ट्री गर्लची भूरळ पडल्याचं दिसलं. व्हायरल होणाऱ्या व्हिडिओत या मिस्ट्री गर्लला पाहिल्यानंतर शुभमन गिलच्या चेहऱ्यावरली एक्स्प्रेशनसुद्धा व्हायरल होत आहेत. 

सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानतंर युजर्सने लगेचच या मिस्ट्री गर्लचं नाव शुभमन गिलशी जोडलं आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @revengeseeker07 नावाच्या युजरने हा व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओबरोबर त्याने एक कॅप्शन दिलं आहे. यात त्याने म्हटलंय, 'शुभमन थ्रिल'. या व्हिडिओवर कमेंटचा पाऊस पडतोय. एका युजरने म्हटलंय, व्हायरल झाल्यावर ही मिस्ट्री गर्ल कोण आहे याची माहिती मिळेल. तर एका युजरने म्हटलंय ही मिस्ट्री गर्ल एखादी सेलिब्रेटी वाटते. तर एका युजरने या मिस्ट्री गर्लला थेट अना डे अर्मासची उपमा दिली आहे. 

आयपीएलमधल्या मिस्ट्री गर्ल
याआधीही आयपीएलदरम्यान अनेक मिस्ट्री गर्ल व्हायरल झाल्या आहेत. आयपीएलच्या गेल्या हंगामात कोलकाता नाईट रायडर्स आणि दिल्ली कॅपिटल्सच्या सामन्या दरम्यान प्रेक्षकांमध्ये बसलेली आरती बेदी चांगलीत व्हायरल झाली होती. आरती बेदी ही एक व्यावसायिक आहे. आयपीएल 2019 दरम्यान एका सामन्यात आपला फेव्हरेट संघ आरसीबीला सपोर्ट करताना कॅमेराची नजर दीपिका घोषवर पडली. लाल रंगाचा हॉट ड्रेस आणि आरसीबीला चिअर करण्याचा अंदाज कॅमेरामनला  चांगलाच आवडला होता.