IPL 2024 : 40 षटकं, 38 षटकार आणि 31 चौकार, मुंबई-हैदराबाद सामन्यात रचले गेले 11 विक्रम

IPL 2024 : मुंबई इंडियन्स आणि सनरायजर्स हैदराबाददरम्यान झालेल्याा सामन्यात अनेक विक्रम रचले गेले. या सामन्यात तब्बल 523 धावा झाल्या. मेन्स टी20 सामम्यातील ही सर्वोच्च धावसंख्या आहे. या सामन्यात तब्बल 38 षटकार ठोकले गेले.

राजीव कासले | Updated: Mar 28, 2024, 05:12 PM IST
IPL 2024 : 40 षटकं, 38 षटकार आणि 31 चौकार, मुंबई-हैदराबाद सामन्यात रचले गेले 11 विक्रम title=

IPL 2024 MI vs SRH : आयपीएल 2024 बुधवारी झालेल्या मुंबई इंडियन्स आणि सनरायजर्स हैदराबाद दरम्यानचा सामना आयपीएल इतिहासातील ऐतिहासिक सामना झाला. हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडिअममध्ये खेळवल्या गेलेल्या या सामन्यात धावांचा पाऊस पडला. पहिली फलंदाजी करणाऱ्या सनरायजर्स हैदराबादने 20 षटकात तीन विकेट गमावत 277 धावा केल्या. तर मुंबई इंडियन्सनेही चोख उत्तर देत 246 धावा केल्या. मुंबईला 31 धावांनी पराभव पत्करावा लागला. 

मुंबई - हैदराबाद सामन्यातील विक्रम

1 - मुंबई इंडियन्स आणि सनरायजर्स हैदराबाद सामन्यात एकूण 523 धावा झाल्या. कोणत्याही मेन्स टी20 सामन्यातील ही सर्वोच्च धावसंख्या आहे. याआधी 2023 मध्ये सेंच्युरीयनच्या मैदानावर दक्षिण आफ्रिका आणि वेस्टइंडिज दरम्यान झालेल्या सामन्यात 517 धावा झाल्या होत्या. दक्षिण आफ्रिकेने 258 तर वेस्टइंडिजने 259 धावा केल्या होत्या.

टी20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा 
523 - सनराजर्स हैदराबाद विरुद्ध मुंबई इंडियंस, हैदराबाद, आयपीएल 2024
517- दक्षिण आफ्रिका विरुद्ध वेस्टइंडीज, सेंच्युरियन, 2023
515- क्वेटा ग्लेडिएटर्स  विरुद्ध मुल्तान सुलतान, रावळपिंडी, पीएसएल 2023
506- सरे विरुद्ध मिडलसेक्स, द ओवल, टी20 ब्लास्ट 2023
501- टायटन्स विरुद्ध नाइट्स, पोटचेफस्ट्रूम, सीएसए टी20 चॅलेंज 2022

2. सनरायजर्स हैदराबादने या सामन्यात तीन विकेट गमावत 277 धावा केल्या. आयपीएल इतिहातील ही सर्वोत्तम धावसंख्या आहे. सनरायजर्सने रॉयल चॅलेंजर्सचा सर्वाधिक धावांचा विक्रम मागे टाकला. 2013 मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने पुणे वॉरिअर्सविरोधात 5 विकेट गमावत 263 धावा केल्या होत्या. 

आयपीएलची सर्वोत्तम धावसंख्या
277/3 - एसआरएच विरुद्ध मुंबई इंडियंस, हैदराबाद, 2024
263/5 - आरसीबी विरुद्ध पुणे वॉरियर्स, बंगळुरु, 2013
257/5 - एलएसजी विरुद्ध पंजाब किंग्स, मोहाली, 2023
248/3- आरसीबी विरुद्ध गुजरात लायन्स, बंगळुरु, 2016
246/5​- सीएसके विरुद्ध राजस्थान रॉयल्स, चेन्नई, 2010
246/5 ​​- एमआई विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद, हैदराबाद, 2024

3. आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सने 277 धावांचा पाठलाग करताना 5 विकेट गमावत 246 धावा केल्या. आयपीएलमधला मुंबई इंडियन्सचा ही सर्वाधिक धावसंख्या आहे. याशिवाय विजयी लक्षाचा पाठलाग करताना एखाद्या संघाने केलेला हा मोठा स्कोर आहे. 

4. सनरायजर्स हैदराबादच्या अभिषेक शर्माने अवघ्या 16 चेंडूत अर्धशतक झळकावलं. टी20 क्रिकेटमधलं हे सर्वात वेगवान अर्धशतक ठरलंय. तर हैदराबादच्याच ट्रेव्हिस हेडने 18 चेंडूत अर्धशतक लगावलं. आयपीएलच्या इतिहासात पहिल्यांदाच असं घडलंय, एकाच संघातील दोन फलंदाजांनी 20 हून कमी चेंडत अर्धशतक पूर्ण केलं.

5. सनरायजर्स हैदराबादने पहिल्या 10 षटकातच 148 धावा केल्या. आयपीएलच्या इतिहासत पहिल्या दहा षटकातील ही सर्वोत्तम धावसंख्या ठरली आहे. मुंबई इंडियन्सने 10 षटकात 141 धावा केल्या. ही दुसऱ्या क्रमांकाची सर्वोत्तम धावसंख्या ठरली आहे.

6. सनरायजर्स हैदराबादने अवघ्या 14.4 षटकात 200 धावांचा टप्पा पूर्ण केला. आयपीएलमध्ये कमी षटकात 200 धावा करण्याचा विक्रम रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या नावावर आहे. आरसीबीने 14.1 षटकात 200 धावांचा टप्पा गाठला होता.

7. मुंबई इंडियन्सचा वेगवान युवा गोलंदाज क्वेना मफाका याने आपल्या आयीएल पदार्पण सामन्यातच 4 षटकात 66 धावा दिल्या. आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा देणारा तो पहिला गोलंदाज ठरला आहे. याआधी 2013 मध्ये आरसीबीने पुण्याच्या मायकल नेसरविरुद्ध 4 षटकात 62 धावा दिल्या होत्या.

8. सनरायर्स हैदराबादने पॉवरप्ले मध्ये 81 धावा केल्या. पॉवर प्लेमधली ही सर्वोत्म धावसंख्या आहे. याआधी 2017 मध्ये हैदराबादने कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध पॉवरप्लेमध्ये 79 धावा केल्या होत्या.

9. सनरायजर्स हैदराबादने आपल्या इनिंगमध्ये 18 षटकार लगावले. आयपीएल इतिहासत कोणत्याही संघाने केलेले हे सर्वाधिक षटकार आहेत. याआधी आयपीएलच्या याच हंगामात कोलकाता नाईट रायडर्स 18 षटकार लगावले होते. 

10. मुंबई वि. हैदराबाद सामन्यात तब्बल 38 षटकार आणि 31 चौकारांची नोंद झाली. आयपीएल इतिहासत दुसऱ्यांदा इतके चौकार लगावले गेले आहेत. याआधी 2010 मध्ये चेन्नई सुपर किंग्सविरुद्धच्या सामन्यात 69 चौकार ठोकले होते.

11. या सामन्यात एकून 38 षटकारांची नोंद झाली. सनरायजर्स हैदराबादने 18 तर मुंबई इंडियन्सने 20 षटकार लगावले. मेन्स टी20 क्रिकेटमधये इतके षटकार मारण्याची ही पहिलीच वेळ आहे.