SRH vs MI : मुंबई इंडियन्सला आयपीएल 2024 मध्ये सलग दूसऱ्या पराभवाचा सामना करावा लागला आहे. हैदराबादच्या प्रत्येक फलंदाजाने मुंबईच्या गोलंदाजांसमोर आपले हात साफ केले आहे. बूधवारी झालेल्या सामन्यात हैदराबादने 278 धावांचे विशाल लक्ष मुंबई समोर ठेवले होते, जवाबात मुंबईच्या टीमने सूद्धा कडवी झूंज दिली पण त्यांचे प्रयत्न अपूरे पडले आणि सनरायझर्स हैदराबादने मुंबई इंडियन्सला 31 धावांनी मात दिली आहे. यासोबतच पॉईंट्स टेबलमध्ये दोन गूण प्राप्त केले आहेत.
मुंबई इंडियन्सने साऊथ आफ्रिकेच्या 17 वर्षीय यूवा गोलंदाजाला दिलशान मधूशंकाच्या जागेवर आपल्या ताफ्यात सामील केले होते. यानंतर हैदराबादविरूद्धच्या सामन्यात या यूवा गोलंदाजाला पदार्पण करण्याची संधी मिळाली, पण हैदराबादच्या फलंदाजांच्या सपाट्यात क्वेन मफाका सापडला आणि 4 ओव्हर्समध्ये त्याच्या विरूद्ध तब्बल 66 धावा ठोकल्या आणि या मॅचमध्ये क्वेनला एकसूद्धा विकेट मिळाली नाही. या मॅचमध्ये SRH च्या फलंदाजांनी क्वेनला 16.50 च्या रनरेटने धूतले, आणि या कारणामुळे IPL मध्ये डेब्यू करणाऱ्या गोलंदाजांमध्ये क्वेन मफाका सर्वात महाग गोलंदाज ठरलेला आहे.
क्वेनने आपल्या आयपीएलच्या करिअरच्या पहिल्या मॅच मध्ये 4 ओव्हर्समध्ये 66 रन्स खर्च करून डेब्यूमध्ये सर्वात खराब बॉलिंग प्रदर्शनाचा रेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे. क्वेन मफाकाच्या हताशाजनक प्रदर्शनामूळे त्याने 11 वर्ष जूना मायकल नासरचा रेकॉर्ड तोडला आहे. मायकलने 2013 साली किंग्स इलेवन पंजाब (आताची पंजाब किंग्स) कडून खेळताना रॉयल चॅलेंजर्स बंगळूरूविरूद्ध 4 ओव्हर्समध्ये 62 रन्स दिले होते. यामूळे क्वेनाने हा नकोसा वाटणारा रेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे. दक्षिण आफ्रिकेचा हा यूवा गोलंदाज साऊथ आफ्रिकेकडून एकही आंतरराष्ट्रीय मॅच खेळलेला नाहीये. पण त्याने आताच झालेल्या अंडर 19 वर्ल्ड कपमध्ये कमालीचे प्रदर्शन करत 9.71 च्या सरासरीने एकूण 21 विकेट्स झटकल्या होत्या, यामूळे क्वेना मफाकाला त्या टूर्नामेंटमध्ये सर्वश्रेष्ठ प्लेअरचा अवॉर्ड मिळाला होता. त्यामूळे आता बघण्यायोग्य असेल की, क्वेनाला मुंबई इंडियन्स पूढच्या मॅचमध्ये खेळवणार की नाही.
0/66 - क्वेना मफाका (MI) विरूद्ध SRH, 2024
0/62 - मायकल नासर (PBKS) विरूद्ध RCB, 2013
0/58 - मशरफे मुर्तजा (KKR) विरूद्ध डेक्कन चार्जर्स, 2009
0/56 - प्रयास रे बर्मन (RCB) विरूद्ध SRH, 2019