IPL 2024 : प्रतिक्षा संपली! 'या' तारखेपासून सुरू होणार आयपीएलचा धुमधडाका

IPL 2024 Start date : सर्वांना उत्सुकता लागलेली आयपीएल येत्या 22 मार्चपासून सुरू होण्याची शक्यता आहे. आयपीएलचे चेअरमन अरूण धुमाळ (Arun Dhumal) यांनी याबाबत माहिती दिलीये.

सौरभ तळेकर | Updated: Feb 20, 2024, 03:52 PM IST
IPL 2024 : प्रतिक्षा संपली! 'या' तारखेपासून सुरू होणार आयपीएलचा धुमधडाका title=
IPL 2024 May start from March 22

IPL 2024 Schedule : सर्वांना उत्सुकता लागलेली आयपीएलचा 17 वा हंगाम (IPL 2024) येत्या 22 मार्चपासून सुरू होणार आहे. यंदाची आयपीएल लोकसभा निवडणुकांमुळे (Loksabha Election) दोन विभागात होणार असल्याचं देखील स्पष्ट झालंय. आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलचे अध्यक्ष अरुण धुमल यांनी याबाबत खुलासा केलाय. 22 मार्च रोजी (IPL 2024 Start date) चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर हा पहिला सामना खेळवला जाणार आहे. त्यामुळे आता गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्ज आणि उपविजेते गुजरात टायटन्स (CSK vs GT) यांच्यात सलामीला सामना होण्याची शक्यता आहे. पीटीआय वृत्तसंस्थेने याबाबत माहिती दिलीये.

देशातील लोकसभा निवडणूक आणि आयपीएल 2024 हंगाम एकाचवेळी होणार आहे. त्यामुळे आयपीएलचा हंगाम नेहमीप्रमाणे भारताबाहेर हलवण्यात येईल अशी चर्चा रंगली होती. मात्र, बीसीसीआय आयपीएल हंगाम भारतातच दोन विभागणीत घेणार असल्याचं समोर आलं आहे. आम्ही याबाबत भारत सरकार आणि क्रिडासह विविध खात्यांसोबत काम करत आहोत. आमचा प्रयत्न हा आयपीएल भारतातच खेळवण्याचा आहे, असं आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलचे अध्यक्ष अरुण धुमल यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, दुबईमध्ये आयपीएल 2024 साठीचा लिलाव पार पडला होता. या लिलावात अनेक रेकॉर्ड मोडीस निघाले आहेत. कोलकाता नाईट रायडर्सने पॅट कमिन्सला 24.75 कोटींची बोली लगावत इतिहास रचला आहे. ऑक्शनमध्ये कोणत्या संघाने कोणत्या खेळाडूला करारबद्ध केलं. त्यामुळे आता यंदाच्या आयपीएलमध्ये तगडी लढत पहायला मिळेल, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. 

गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात पहिला सामना खेळवला जाण्याची शक्यता आहे. दोन्ही टीमचा संपूर्ण संघ पाहुया...

गुजरात टायटन्स : डेव्हिड मिलर, शुभमन गिल (C), मॅथ्यू वेड, वृद्धिमान साहा, केन विल्यमसन, अभिनव मनोहर, बी. साई सुदर्शन, दर्शन नळकांडे, विजय शंकर, जयंत यादव, राहुल तेवतिया, मोहम्मद शमी, नूर अहमद, साई किशोर, रशीद खान, जोशुआ लिटल, मोहित शर्मा, अजमतुल्ला ओमरझाई, उमेश यादव, शाहरुख खान, सुशांत मिश्रा, कार्तिक त्यागी, मानव सुथार, स्पेन्सर जॉन्सन, रॉबिन मिन्झ.

चेन्नई सुपर किंग्ज : एमएस धोनी (C), मोईन अली, दीपक चहर, डेव्हॉन कॉनवे, तुषार देशपांडे, शिवम दुबे, रुतुराज गायकवाड, राजवर्धन हंगरगेकर, रवींद्र जडेजा, अजय मंडल, मुकेश चौधरी, मथीशा पाथीराना, अजिंक्य रहाणे, शेख रशीद सिंग, मिचेल सिंग, शेख रशीद. , निशांत सिंधू, प्रशांत सोलंकी, महेश थेक्षाना, रचिन रवींद्र, शार्दुल ठाकूर, डॅरिल मिशेल, समीर रिझवी, मुस्तफिजुर रहमान, अवनीश राव अरवेल्ली.