Rohit Sharma: तुला काय वाटतं? DRS चा निर्णय घेण्यापूर्वी रोहित शर्माने थेट अंपायरला विचारलं

Viral Video: राजकोट टेस्ट सामन्याच्या दुसऱ्या दिवशी भारताचा गोलंदाज जसप्रीत बुमराहने अप्रतिम गोलंदाजी केली. यावेळी जो रूटलाही बुमराहने आपलं शिकार बनवले. 

सुरभि जगदीश | Updated: Feb 20, 2024, 12:57 PM IST
Rohit Sharma: तुला काय वाटतं? DRS चा निर्णय घेण्यापूर्वी रोहित शर्माने थेट अंपायरला विचारलं title=

Viral Video: नुकतंच राजकोट टेस्टमध्ये रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने इंग्लंडचा पराभव केला. या विजयानंतर कर्णधार रोहित शर्मा फार खूश दिसून आला. दरम्यान मैदानावर हिटमॅनचा मस्करीचा स्वभाव प्रत्येकाला माहितीये. त्याचा हा अंदाज प्रत्येक सामन्यात दिसून येतो. असंच राजकोटच्या सामन्यात देखील रोहित शर्माचा असा अंदाज पहायला मिळाला. 

राजकोट टेस्ट सामन्याच्या दुसऱ्या दिवशी भारताचा गोलंदाज जसप्रीत बुमराहने अप्रतिम गोलंदाजी केली. यावेळी जो रूटलाही बुमराहने आपलं शिकार बनवले. दरम्यान रूटच्या विकेनंतर त्याने जॉनी बेअरस्टोकडे मोर्चा वळवला. बुमराहने बेअरस्टोला असा यॉर्कर टाकला, जो त्याला खेळता आला नाही. यावेळी बॉल त्याच्या पॅडला लागला. त्यानंतर भारतीय खेळाडूंनी एलबीडब्ल्यूचे अपील केलं. मात्र हे अपील अंपायर मेरी इरास्मस यांनी फेटाळलं. अशा स्थितीत गोलंदाजाने रोहितकडे पाहिलं आणि डीआरएस घेण्याबाबत थेट विचारलं.

DRS बाबत रोहितची थेट अंपायरला विचारणा

या घटनेनंतर रोहितही यष्टीरक्षकाकडे गेला आणि त्याच्याशी बोलताना दिसला. कीपर केएस भरत यांच्याशी चर्चा केल्यानंतर रोहितने अंपायर इरास्मससोबत मस्करी करण्याचा विचार केला. यावेळी कॅप्टन रोहितने मुद्दाम अंपायरकडे पाहिलं आणि त्याला विचारलं, "मारैस, तुला काय वाटतं?" रोहितचे हे शब्द स्टंप माइकमध्ये कैद झालेत जे आता सोशल मीडियावर व्हायरल होतायत.

टीम इंडियाचा सलग दुसरा विजय

राजकोट टेस्टमध्ये  टीम इंडियाने इंग्लंड टीमचा 434 रन्सने पराभव केला. टेस्ट क्रिकेटच्या इतिहासातील टीम इंडियाचा हा सर्वात मोठा विजय ठरला आहे. त्याचबरोबर टीम इंडियाने पाच सामन्यांच्या सिरीजमध्ये 2-1 ने विजय मिळवला आहे. यशस्वी जयस्वालचं द्विशतक, रोहित आणि जडेजाच्या शतकीय खेळीच्या जोरावर टीम इंडियाला हा विजय मिळवता आला आहे.

यशस्वी जयस्वालचं द्विशतक

इंग्लंडच्या दौऱ्यावर यशस्वीने सलग दुसऱ्या टेस्टमध्ये द्विशतक झळकावलंय. याआधी यशस्वीने विशाखापट्टणम टेस्टच्या पहिल्या डावातही 209 रन्स केले होते. राजकोट टेस्टमध्ये तिसऱ्या दिवशी यशस्वी जायस्वालने शतक ठोकलं होतं. पण दुखापतीमुळे त्याला मैदान अर्ध्यावर सोडावं लागलं होतं. मात्र तो पुन्हा मैदानावर परतला आणि नाबाद खेळी केली.