आयपीएल तोंडावर असताना हार्दिक अन् रोहितमध्ये 'अबोला', पांड्याने केला खुलासा 'माझ्या खांद्यावर...'

Hardik Pandya vs Rohit Sharma : मुंबई इंडियन्सची (Mumbai Indians) कॅप्टन्सी करताना  रोहितचा हात नक्कीच माझ्या खांद्यावर असेल, असा विश्वास नवा कर्णधार हार्दिक पांड्याने व्यक्त केला आहे.

सौरभ तळेकर | Updated: Mar 18, 2024, 05:10 PM IST
आयपीएल तोंडावर असताना हार्दिक अन् रोहितमध्ये 'अबोला', पांड्याने केला खुलासा 'माझ्या खांद्यावर...' title=
Hardik Pandya Rapport With Rohit Sharma

Hardik Pandya Breaks Silence On Rohit Sharma : आयपीएलसाठी (IPL 2024) आता फक्त चार दिवस शिल्लक आहेत. यंदाच्या हंगामासाठी झालेल्या ऑक्शनपूर्वी मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) मोठा डाव खेळला. मुंबईने खांदेपालट करत रोहित शर्माला कॅप्टन्सीच्या जबाबदारीतून मुक्त केलं अन् हार्दिक पांड्यावर (Hardik Pandya) डाव खेळलाय. आता हार्दिकच्या नेतृत्वात मुंबई कितपत यशस्वी होणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. अशातच आता आयपीएल तोंडावर असताना हार्दिक पांड्याने रोहितवर बोलताना मोठं वक्तव्य केलंय.

काय म्हणाला हार्दिक पांड्या?

सर्वांनाच माहितीये की माझ्या करियरची सुरूवात इथूनच सुरू झाली. 2015 पासून मी या संघासोबत जोडलो गेलो अन् माझं आयुष्य बदललं. आत्तापर्यंतचा प्रवास खुश स्वप्नवत होता. मी असा विचार देखील केला नव्हता. माझ्या आवडीच्या क्रिकेट मैदानात येऊन खेळणं आनंददायी असतं, त्यामुळे पुन्हा मुंबईमध्ये येऊन मला नक्की आनंद झालाय, असं हार्दिक पांड्या म्हणतो. पुढे त्याने रोहितवर बोलताना (Hardik Pandya On Rohit Sharma) प्रतिक्रिया दिली.

रोहितवर काय म्हणाला पांड्या?

रोहित शर्मा टीम इंडियाचा कॅप्टन आहे, त्याची मला नक्कीच मदत होईल. मुंबईने आत्तापर्यंत जी काही कामगिरी केलीये, यामागे रोहितची मेहनत आहे.  आता मला फक्त हीच परंपरा पुढे चालवत घेऊन जायची आहे. मी माझ्या करियरमध्ये आत्तापर्यंत नक्कीच रोहितच्या कॅप्टन्सीखाली खेळलोय, त्यामुळे मला माहितीये, त्याचा हात नक्कीच माझ्या खांद्यावर असेल, असा विश्वास हार्दिक पांड्याने व्यक्त केलाय. माझं आत्तापर्यत त्याच्याशी बोलणं झालं नाही. आम्ही सतत प्रवासात असल्याने त्याचं आणि माझं काहीही बोलणं झालं नाहीये, असा खुलासा देखील हार्दिक पांड्याने केला आहे.

MI ची संभाव्य प्लेइंग इलेव्हन - रोहित शर्मा, इशान किशन (WK), तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, टीम डेव्हिड, रोमॅरियो शेफर्ड, जेराल्ड कोएत्झी, पियुष चावला, जसप्रीत बुमराह, नुवान थुसारा.

IPL 2024 साठी मुंबई इंडियन्सचा संघ - 

हार्दिक पंड्या (C), रोहित शर्मा, देवाल्ड ब्रेविस, सूर्यकुमार यादव, इशान किशन, एन. तिलक वर्मा, टीम डेव्हिड, विष्णू विनोद, अर्जुन तेंडुलकर, शम्स मुलानी, नेहल वढेरा, जसप्रीत बुमराह, कुमार कार्तिकेय, पियुष चावला, आकाश मधवाल, जेसन बेहरेनडॉर्फ, रोमॅरियो शेफर्ड, जेराल्ड कोएत्झी, दिलशान मदुशंका, श्रेयस गोपाल, नुवान तुषारा, नमन धीर, अंशुल कंबोज, मोहम्मद नबी, शिवालिक शर्मा.