कशी झाली होती हार्दिकला दुखापत?
ऑक्टोबरमध्ये पुण्यात बांगलादेशविरुद्धच्या एकदिवसीय विश्वचषक सामन्यादरम्यान गुडघ्याला दुखापत झाल्यापासून हार्दिक पांड्या क्रिकेटपासून दूर होता. पाच वेळा विजेतेपद मिळवलेल्या मुंबई इंडियन्स संघाचा नवा कर्णधार म्हणून तो आता इंडियन प्रिमियर लीग (IPL 2024) मध्ये पुनरागमन करण्यासाठी सराव करत आहे.
मुंबई इंडियन्स (MI) ने जाहीर केले आहे की आयपीएलपासून हार्दिक पंड्या दीर्घकाळ संघाचे नेतृत्व करणाऱ्या रोहित शर्माकडून कर्णधारपदाची जबाबदारी स्वीकारेल. रोहितच्या नेतृत्वाखाली मुंबई संघाने पाच वेळा आयपीएल जिंकले आहे. योगायोगाने, मुंबई इंडियन्सच्या कर्णधारपदाची पांड्याची पहिली सुरुवात ही अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर गुजरातविरुद्ध होईल, कारण आगामी हंगामातील दोन्ही संघांचा पहिला सामना हा एकमेकांविरुद्ध होणार आहे.
हार्दिकचं कमबॅक
भारतीय अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्याने सोमवारी डीवाय पाटील टी-२० कपमध्ये दीर्घ दुखापतीनंतर पुनरागमन केलं. रिलायन्स वनच्या पहिल्या विजयात मोलाचा वाटा होता, त्याने तीन षटकांत २२ धावा देत दोन विकेट्स घेतल्या होत्या. हा सामना कमी धावसंख्येचा होता आणि 'रिलायन्स वन'ने तो दोन गडी राखून जिंकला. सामना डीवाय पाटील क्रिकेट अकादमी येथे भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडविरुद्ध खेळला गेला.
रिलायन्स वनच्या संघात तिलक वर्मा, नेहल वधेरा, आकाश मढवाल, नमन धीर आणि पीयूष चावला या मुंबई इंडियन्सच्या खेळाडूंनीही सहभाग घेतलेला आहे.
डीवाय पाटील टी-२० ही एकूण १६ संघांनी सहभाग घेतलेला आहे. ही एक कौन्सिल स्पर्धा आहे. विश्वचषकानंतर सामन्यांपासून दूर असलेला भारतीय यष्टिरक्षक-फलंदाज इशान किशनही स्पर्धात्मक क्रिकेटमध्ये पुनरागमन करणार आहे. तो मंगळवारी रिजर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून, रूट मोबाइलविरुद्ध खेळण्यासाठी सज्ज आहे.