IPL 2024 चा पहिला सामना कधी, कुठे आणि कसा पाहता येईल? जाणून घ्या

IPL 2024 CSK vs RCB Live Streaming: आयपीएलचा 17 वा हंगामा सुरु होण्यासाठी अवघे दोन दिवस शिल्लक राहिले आहेत. हंगामातील पहिली लढत चेन्नई आणि बेंगळुरु यांच्यात होणार आहे. मात्र आयपीएलचे सर्व सामने कधी आणि कुठे पाहाल? जाणून घ्या... 

श्वेता चव्हाण | Updated: Mar 20, 2024, 04:21 PM IST
IPL 2024 चा पहिला सामना कधी, कुठे आणि कसा पाहता येईल? जाणून घ्या title=

IPL 2024 CSK vs RCB Free Live Streaming:  22 मार्चपासून आयपीएलच्या 17 व्या हंगामातील पहिला सामना चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध रॉयल चॅलेंजर बंगळूरु यांच्यात रंगणार आहे. महेंद्रसिंह धोनी याच्या नेतृत्वात चेन्नई सुपर किंग्जने 2009, 2011, 2012, 2018, 2019, 2022 आणि 2023 हंगामातील सलामीचा सामना खेळला आहे. त्यातच आता पहिला सामन्याकडे क्रिकेटप्रेमींचे लक्ष लागून राहिले आहे. मात्र आयपीएलचा हा सामना तुम्ही कधी आणि कुठे बघणार? असा प्रश्न पडला असेल तर जाणून घ्या सविस्तर बातमी.. 

आयपीएल 17 व्या हंगामातील पहिला सामना 22 मार्चला रात्री 8 वाजता सुरु होईल. त्यानंतर मात्र सर्व सामने दुपारच्या वेळेत म्हणजेच 3 वाजून 30 मिनिटांनी सुरु होतील. तर संध्याकाळचे सामने हे 7 वाजून 30 मिनिटांनी सुरु होतील. तसेच यंदा आयपीएलच्या 17 व्या हंगामाचं पहिल्या टप्प्यातील वेळापत्रक जाहीर करण्यात आले. त्यानुसार पहिल्या टप्प्यात एकूण 17 दिवसांमध्ये 2 डबल हेडरसह एकूण 21 सामने पार पडणार आहेत.

सामना कुठे पाहता येणार?

22 मार्च रोजी चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध रॉयल चॅलेंजर बंगळूरु हा सामना खेळला जाणार आहे. हा सामना तुम्ही जिओ सिनेमा या अॅपवर आयपीएलचे सर्व सामने मोफत ऑनलाईन लाईव्ह स्ट्रीमिंग बघू शकता. टिव्हिवर स्टार स्पोर्ट्स चॅनेलवर आयपीएलचे  थेट प्रसारण होणार आहे. 

चेन्नई सुपर किंग्सचा स्क्वॉड : एम.एस.धोनी (कॅप्टन), अजय मंडल, अजिंक्य रहाणे, दीपक चहर, डेव्हॉन कॉनवे, महिश तीक्ष्णा, महिषा पथिराना, मिचेल सँटनर, मोईन अली, मुकेश चौधरी, निशांत सिंधू, प्रशांत सोळंकी, राजवर्धन हंगरगेकर, रविंद्र जडेजा, ऋतुराज गायकवाड, शेख रशीद, शिवम दुबे, सिमरजित सिंग, तुषार देशपांडे, शार्दुल ठाकूर, रचिन रवींद्र, डेरेल मिशेल, समीर रिझवी, मुस्ताफिझूर रहमान आणि अरावेसी अवनीश

आरसीबीचा स्क्वॉड : फाफडु प्लेसिस (कॅप्टन), विराट कोहली, यश दयाल, टॉम करन, लॉकी फर्ग्युसन, स्वप्नील सिंह, सौरव चौहान, रजत  पाटिलदार, अनुज रावत, दिनेश कार्तिक, सुयथ प्रभुदेसाई, विल जॅक्स, ग्लेन मॅक्सवेल, महिपाल लॅमरोर, कर्ण शर्मा, मनोज भांडगे, आकाशदीप, मोहम्मद सिराज, रीस टॉप्ली, हिमांशू शर्मा , राजन कुमार, विजयकुमार, कॅमेरुन ग्रीन आणि मयंक डागर