कोलकाताच्या पराभवानंतर आयपीएल पॉईंटटेबलमध्ये उलटफेर, दिल्ली, बंगळुरु प्ले ऑफ गाठणार?

CSK vs KKR : इंडियन प्रीमिअर लीगच्या सतराव्या हंगामात चेन्नई सुपर किंग्स आणि कोलकाता नाईट रायडर्समध्ये सामना रंगला. या सामन्यात चेन्नईने कोलकाताचा 7 विकेटने पराभव. या सामन्यानंतर पॉईंटटेबलमध्ये मोठा उलटफेर पाहायला मिळतोय. 

राजीव कासले | Updated: Apr 9, 2024, 03:28 PM IST
कोलकाताच्या पराभवानंतर आयपीएल पॉईंटटेबलमध्ये उलटफेर, दिल्ली, बंगळुरु प्ले ऑफ गाठणार? title=

IPL 2024 Points Table Update : आयपीएल 2024 चा 22 वा सामना चेन्नई सुपर किंग्स (CSK) आणि कोलकाता नाईट रायडर्सदरम्यान (KKR) खेळवण्यात आला. चेन्नईच्या एम ए चिदम्बरम स्टेडिअमवर खेळवण्यात आलेल्या या सामन्यात चेन्नईने कोलकाताचा 7 विकेट राखून पराभव केला. यंदाच्या हंगामातील कोलकाता नाईट रायडर्सचा हा पहिला पराभव ठरला आहे. चेन्नईच्या विजयाने आयपीएल पॉईंटटेबलमध्येही (IPL PointTable) मोठा उलटफेर पाहायला मिळाला. 

आयपीएल पॉईंटटेबल
आयपीएलच्या यंदाच्या हंगामात चेन्नई सुपर किंग्सने आपला तिसरा विजय नोंदवला. या विजयाबरोबर चेन्नईच्या खात्यात सहा पॉईंट जमा झाले असून +0.666 च्या नेट रनरेटसह चेन्नई चौथ्या पॉईंटटेबलमध्ये चौथ्या क्रमांकावर आहे. तर पराभवानंतर कोलकाता नाईट रायडर्सच्या खात्यातही 6 पॉईंट जमा असून +1.528  नेट रनरेटसह कोलकाता पॉईंटटेबलमध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे.

अशा आहेत टॉप फोर टीम
यंदाच्या हंगामात सर्व चार सामने जिंकत राजस्थान रॉयल्स संघाच्या खात्यात 8 पॉईंट जमा असून +1.120 च्या नेट रनरेटसह राजस्थान अव्वल स्थानावर आहे. कोलकाता नाईट रायडर्स दुसऱ्या क्रमांकावर तर चारपैकी तीन सामन्यात विजय मिळवणारा लखनऊ सुपर जायंट्सचा संघ तिसऱ्या क्रमांकावर आहे. कोलकाताच्या खात्यात 6 पॉईंट जमा असून त्यांचा नेट रनरेट +0.775 इतका आहे. चेन्नई सुपर किंग्स चौथ्या क्रमांकावर आहे. 

इतर संघांची अवस्था
आयपीएल पॉईंटटेबलमध्ये पॅट कमिन्सचा सनरायजर्स हैदराबादच संघ पाचव्या क्रमांकावर आहे. तर शिखर धवनाच पंजाक किंग्स सहाव्या आणि शुभमन गिलचा गुजरात टायटन्स सातव्या क्रमांकावर आहे. हे तीनही संघांच्या खात्यात 4-4 पॉईंट जमा आहेत. पण नेट रनरेटमुळे या तीन संघांची क्रमवारी बदलली आहे. हैदराबाद आणि पंजाबने चारपैकी प्रत्येकी दोन सामन्यात विजय मिळवलाय. तर गुजरातने पाचपैकी दोन सामन्यात विजय प्राप्त केला आहे.

या यादीत मुंबई इंडियन्स आठव्या, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु नवव्या आणि दिल्ली कॅपिटल्स दहाव्या क्रमांकावर आहे. सर्व संघांच्या खात्यात प्रत्येकी 2 पॉईंट जमा आहेत. मुंबई इंडियन्सने चार पैकी केवळ एक सामना जिंकला आहे. तर बंगळुरु आणि दिल्लीने पाच सामन्यांमध्ये केवळ एक विजय मिळलाय. दिल्ली कॅपिटल्सचा नेट रनरेट सर्वात खराब आहे. त्यामुळे पॉईंट टेबलमध्ये दिल्ली सर्वात तळाला म्हणजे दहाव्या क्रमांकावर आहे. 

दिल्ली-बंगळुरु प्ले ऑफ गाठणार?
आयपीएलमध्ये प्रत्येक संघ चौदा सामने खेळणार आहे. यापैकी चार सामन्यात सामन्यात दिल्ली आणि बंगळुरुला चार पराभव पत्करावा लागले आहेत. त्यामुळे प्ले ऑफ गाठण्यासाठी दिल्ली आणि बंगळुरु संघाला पुढचा प्रत्येक सामना जिंकावा लागणार आहे, आणि त्याचबरोबर नेट रन रेटही सुधाराव लागणार आहे.