Virat Kohli Video Call: ...अन् विराट कोहलीने मैदानातूनच केला खास व्यक्तीला Video कॉल; पाहा नक्की घडलं काय

Virat Kohli Video Call After Scoring Century: विराट कोहलीने आयपीएलमधील 6 वे शतक गुरुवारी हैदराबादच्या संघाविरुद्ध झळकावलं. विराटने हे शतक झळकताना 12 चौकार आणि 4 षटकार लगावले.

स्वप्निल घंगाळे | Updated: May 19, 2023, 08:53 AM IST
Virat Kohli Video Call: ...अन् विराट कोहलीने मैदानातूनच केला खास व्यक्तीला Video कॉल; पाहा नक्की घडलं काय title=
Virat Kohli Video Call

Virat Kohli Video Call After Scoring Century: अगदी करो या मरो सामन्यामध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या संघाने हैदराबादवर (RCB vs SHR) 8 विकेट्ने विजय मिळवला. या विजयाचा शिल्पकार ठरला तो आरसीबीचा माजी कर्णधार विराट कोहली (Virat Kohli). विराटने या सामन्यामध्ये शतक झळकावलं (Virat Kohli Century). विराटचं हे 6 वं आयपीएल शतक ठरलं. या विजयाबरोबरच रॉयल चॅलेंजर्सचा प्लेऑफ्सचा (IPL Playoffs) मार्ग अधिक सुखकर झाला आहे. विराटच्या या दमदार खेळीनंतर त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होतो. सामना संपल्यानंतरही अनेकांनी विराटचं अभिनंदन ऑन आणि ऑफ द फिल्ड केलं. मात्र सामन्यानंतर विराटला ओढ लागलेली एका खास व्यक्तीशी बोलण्याची. यासाठी त्याने सामना संपल्यावर लगेच या व्यक्तीला व्हिडीओ कॉल केला. मैदानामधून विराटने केलेल्या या व्हिडीओ कॉलचा व्हिडीओ सध्या व्हायरल झाला आहे.

शतक झळकावल्यानंतर तंबूत परतला

हैदराबादच्या घरच्या मैदानावर खेळताना आरसीबीला मिळालेला पाठिंबा आणि विराटने शतक झळकावण्यासाठी लगावलेल्या षटकारानंतर झालेला जल्लोष पाहून सामना हैदराबादमध्ये आणि ही बंगळुरुमध्ये असा प्रश्न पडावं असं वातावरण मैदानात होतं. विराट शतक साजरं करुन बाद झाला. मात्र तो तंबूत परतला तेव्हा सामना जिंकण्याची केवळ औपचारिकता बाकी होती. विराटने आपल्या 12 चौकार आणि 4 षटकार लगावले. विराटने 63 चेंडूंमध्ये ही खेळी केली. या शतकाबरोबरच आयपीएलमध्ये 6 शतकं झळकावणारा विराट हा एकमेव खेळाडू ठरला आहे.

नक्की वाचा >> RCB च्या विजयाने मुंबईसमोर 'विराट' संकट! Playoffs चं गणित गडबडलं; समजून घ्या समीकरण

तो व्हिडीओ कॉल

विराटने विजयानंतर मैदानावरुनच पत्नी अनुष्का शर्माला व्हिडीओ कॉल केला. विराट आणि अनुष्का व्हिडीओ कॉलवरुन गप्पा मारत असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. विराट आणि अनुष्का गप्पा मारत असल्याचे फोटोही सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरले. 

1)

2)

3)

अनुष्काचं स्टेटस

दरम्यान, अनुष्काने सामना संपल्यानंतर विराटचे फोटो इन्स्ताग्रामला स्टेटसला ठेवले होते. विराट हा बॉम्ब आहे, काय भन्नाट खेळी केली त्याने अशा ओळी या स्टेटमध्ये अनुष्काने लिहिल्या होत्या. या फोटो कोलाजमध्ये विराटने शतक झळकावल्यानंतर केलेलं सेलिब्रेशन, फटकेबाजी करतानाचे फोटो आणि चाहत्यांनी विराटच्या नावाचं पोस्टर पकडल्याचे फोटो दिसत आहेत.

आरसीबीला फायदा...

आता बंगळुरुचा साखळी फेरीतील अंतिम सामना गुजरात जायंट्सविरुद्ध होणार आहे. गुजरातविरुद्धचा सामना जिंकून प्लेऑफ्समध्ये आपलं स्थान निश्चित करण्याचा आरसीबीचा प्रयत्न असेल. आरसीबीबरोबरच मुंबई इंडियन्स, चेन्नई सुपर किंग्स, लखनऊ सुपर जायंट्स, पंजाब किंग्स, कोलकाता नाईट राडयर्सचे संघही अजून प्लेऑफ्सच्या शर्यतीमध्ये आहेत. केवळ गुजरातच्या संघाने प्लेऑफ्समध्ये आपला प्रवेश निश्चित केला आहे. सध्या उरलेल्या 3 जागांसाठी 7 संघ स्पर्धा करत असल्याचं चित्र पहायला मिळत आहे.