SRK Virat Dance Video: झुमे जो विराट... SRK बरोबर मैदानातच 'झुमे जो पठाण'वर थिरकला King Kohli

Shah Rukh Khan Virat Kohli Jhoome Jo Pathaan Dance: इडन गार्डन्सवरील सामन्यामध्ये केकेआरने आरसीबीला पराभूत केल्यानंतर शाहरुखने विराटसोबत पठाणमधील गाण्यावर केला भन्नाट डान्स

Updated: Apr 7, 2023, 11:13 AM IST
SRK Virat Dance Video: झुमे जो विराट... SRK बरोबर मैदानातच 'झुमे जो पठाण'वर थिरकला King Kohli title=
SRK And Virat Kohli Jhoome Jo Pathaan Dance

SRK And Virat Kohli Jhoome Jo Pathaan Dance: इडन गार्डन्सवर झालेल्या इंडियन प्रिमिअर लिगमधील 9 व्या सामन्यामध्ये कोलकाता नाईड रायडर्सने घरच्या मैदानावर बंगळुरु रॉयल चॅलेंजर्सचा मोठ्या फरकाने पराभव केला. केकेआरने हा सामना 81 धावांनी जिंकला. या सामन्याच्या सुरुवातीला आरसीबी आरामात सामना जिंकेल असं वाटलं होतं. मात्र कोलकात्याच्या गोलंदाजांनी दमदार पुनरागमन करत सामना जिंकून दिला. हा सामना पाहण्यासाठी केकेआरचा मालक अभिनेता शाहरुख खानही मैदानात उपस्थित होता. सामना संपल्यानंतर शाहरुखने मैदानात येऊन विराटची गळाभेट घेतली. त्यानंतर हे दोघेही मैदानातच झुमे जो पठाण या शाहरुखच्या 'पठाण' चित्रपटातील गाण्यावर थिरकले. सामना पराभूत झालेल्या आरसीबीचे चाहते निराश झाले असले तरी शाहरुखबरोबर विराटला डान्स करताना पाहून त्यांच्याही चेहऱ्यावर हसू फुललं.

शाहरुख मैदानात आला अन्...

कोलकात्याने 4 वर्षानंतर आपल्या घरच्या मैदानावर दमदार पुनरागमन करत यंदाच्या पर्वातील आपला पहिला विजय नोंदवला. आरसीबीने मुंबईविरुद्धचा पहिला सामना जिंकला होता त्यामुळे आरसीबीचं पारडं या सामन्यात जड वाटत होतं. मात्र केकेआरच्या गोलंदाजांनी भन्नाट कामगिरी करत सामना जिंकवून दिल्यानंतर किंग खान अगदी हसतच मैदानात आला. पोस्ट मॅच प्रेझेन्टेशननंतर शाहरुख मैदानातच विराटबरोबर थिरकला.

विराट मैदानात असतानाच शाहरुख आला आणि त्याने लाडाने शाहरुखचे गाल पकडले. त्यानंतर त्याने विराटला कडकडून मिठी मारली. नंतर शाहरुखने विराटचा हात पकडून त्याला झुमे जो पठाण गाण्याच्या स्टेप्स दाखवल्या. दोघांनीही या गाण्यातील स्टेप्स केल्या. दोघांनी केलेला डान्स पाहून समालोचकांनाही आश्चर्य वाटलं. कोहलीच्या पायाला बॅण्डएड असतानाही तो शाहरुखच्या सांगण्यावरुन नाचला. शाहरुखच नाचायला सांगत असेल तर कोहलीही त्याला नाही म्हणणार नाही असं समालोचक म्हणाले. विराट आणि शाहरुखचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

1)

2)

3)

4)

4)

माझ्यापेक्षा चांगलं नाचले

मागील माहिन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या कसोटी सामन्यामध्ये विराट कोहली आणि रविंद्र जडेजा मैदानावरच 'झुमे जो पठाण'वर नाचताना दिसले होते. हा व्हिडीओ पाहून शाहरुखही चांगलाच इम्प्रेस झाला होता. शाहरुखने या दोघांनी माझ्यापेक्षा चांगला डान्स केलाय, म्हणत हा व्हिडीओ रिट्वीट केलेला.

दरम्यान, आरसीबी आणि केकेआरदरम्यानचा हा सामना पाहण्यासाठी शाहरुखबरोबरच त्याची मुलगी सुहाना खान, सुहानाची बेस्ट फ्रेण्ड आणि अभिनेता संजय कपूरची मुलगी शनाया कपूरही मैदानात उपस्थित होते. याशिवाय शाहरुखची मॅनेजर पुजा दादलानी, ज्येष्ठ गायिका उषा उत्थुप आणि केकेआरची सहमालकीण अभिनेत्री जुही चावलाही उपस्थित होती. जुही चावलाने संघाच्या विजयानंतर आमचा संघ अशीच कामगिरी करत राहो आणि आम्ही यंदा जेतेपद जिंकावं अशी इच्छा व्यक्त केली.