RR vs LSG Dream 11 Team Prediction, IPL 2023: इंडियन प्रीमियर लीग (IPL 2023) हंगामातील 26 वा सामना आज राजस्थान रॉयल्स (RR) आणि लखनऊ सुपर जायंट्स (LSG) यांच्यात होणार आहे. जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर आज (19 एप्रिल 2023) संध्याकाळी 7.30 वाजता सामना होईल. राजस्थान रॉयल्सचे नेतृत्व संजू सॅमसनकडे आहे. तर लखनऊ सुपर जायंट्सचे नेतृत्व केएल राहुलकडे आहे. दोन्ही संघांमध्ये अनेक स्टार खेळाडू आहेत जे जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर आपले कौशल्य दाखवण्यासाठी उत्सुक असतील. या दोन्ही संघांची आजची खेळी ही पहिल्या क्रमांकावर येण्यासाठी होणार आहे.
राजस्थान रॉयल्सने या आयपीएल हंगामात आतापर्यंत 5 सामने खेळले आहेत. ज्यामध्ये पंजाब किंग्जविरुद्धचा एक सामना गमावल्यानंतर सलग तीन सामने जिंकले आहेत. आतापर्यंत राजस्थान रॉयल्सने 5 पैकी 4 सामने जिंकले आहेत. तर लखनऊ सुपर जायंट्सने केएल राहुलच्या नेतृत्वाखालील या संघाने आतापर्यंत खेळलेल्या 5 सामन्यांमध्ये 2 सामन्यामध्ये पराभवाला समोरे जावे लागले. तर 3 सामने जिंकले आहेत. शेवटच्या तीन सामन्यांमध्ये सलग दोन सामने जिंकल्यानंतर पंजाब किंग्जकडून शेवटचा सामना 2 गडी राखून पराभव स्विकारावा लागला. दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत 5- 5 समोर झाले असून राजस्थान 4 विजय आणि 1 पराभवासह गुणतालिकेत अव्वल स्थानावर आहे. आणि लखनऊ 3 विजयांसह दुसऱ्या स्थानावर आहे. त्यामुळे आजचा सामना हा नंबर वन येण्यासाठी दोन्ही संघांचा प्रयत्न असणार आहे.
खेळपट्टीचा अहवाल कसा असेल?
राजस्थान रॉयल्स आणि लखनऊ सुपर जायंट्स यांच्यात होणारा हा सामना जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर होईल. या मैदानावर पहिल्या डावात सरासरी 157 धावांची आहे. या मैदानात खेळल्या गेलेल्या 47 डावांपैकी प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने केवळ 15 सामने जिंकले. आजपर्यंत या खेळपट्टीवर 200 धावा झाल्या नाहीत. अशा परिस्थितीत नाणेफेक जिंकणारा संघ येथे प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेईल.
जयपूरमध्ये आज ढगाळ वातावरण असेल पण पावसाची शक्यता नाही. तसेच रात्रीच्या वेळी दव पडल्यामुळे चेंडू ओला होऊ शकतो. आज कमाल तापमान 38 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 25 अंश सेल्सिअसपर्यंत राहण्याची शक्यता आहे.
राजस्थान रॉयल्स: संजू सॅमसन (कर्णधार आणि यष्टिरक्षक), जोस बटलर, यशस्वी जैस्वाल, शिमरॉन हेटमायर, रवी अश्विन, जेसन होल्डर, संदीप शर्मा, युझवेंद्र चहल, ध्रुव जुरेल, कुलदीप सेन, रियान पराग
इम्पॅक्ट प्लेअर: देवदत्त पडिक्कल
लखनऊ सुपर जायंट्स: केएल राहुल (कर्णधार), काइल मेयर्स, कृणाल पंड्या, मार्कस स्टोइनिस, निकोलस पूरन, दीपक हुडा, आयुष बडोनी, मार्क वुड, रवी बिश्नोई, यश ठाकूर, जयदेव उनाडकट
इम्पॅक्ट प्लेयर: कृष्णप्पा गौतम