IPL 2023 : आयपीएलच्या यंदाच्या पर्वामध्ये काही सामन्यांत गटांगळ्या खाल्ल्यानंतर मुंबईच्या संघाला आता पुन्हा सूर गवसला आहे. संघाच्या खात्यात विजयी सामन्यांची नोंद होत आहे, तर खेळाडूंच्या खात्यात दणदणीत रकमेची. कोट्यवधींची रक्कम देत संघात निवड झालेल्या मुंबईच्या संघातील खेळाडू त्यांच्या कामगिरीमुळंही काही पुरस्कारांसाठी पात्र ठरत असून, त्यांच्या खात्यातील रकमेत भर पडताना दिसत आहे.
नुकताच मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद (SRH vs MI) या दोन्ही संघांमध्ये एक सामना खेळवण्यात आला होता. ज्यामध्ये मुंबईच्या संघानं 14 धावांनी विजय मिळवला. या सामन्यात अर्जुन तेंडुलकरनं (Arjun Tendulkar) गोलंदाजी करत मिळवलेली पहिलीवहिली Wicket चर्चेचा विषय ठरलीच. पण, विजयाचा खरा मानकरी ठरला कॅमरून ग्रीन (Cameron Green ).
मुंबईच्या संघासाठी कॅमरूननं दिलेलं योगदान पाहता त्याला 'प्लेयर ऑफ द मॅच' म्हणून निवडण्यात आलं. यासोबतच त्याला एकूण चार पुरस्कार मिळाले. ज्यामुळं त्याच्या खात्यात 1 लाख रुपये म्हणजेच आतापर्यंत वाढीव 4 लाख रुपये जमा झाले आहेत. हैदराबादविरोधातील सामन्यात त्यानं 40 चेंडूंमध्ये 64 धावांची खेळी करत 1 गडीही बाद केला होता.
मुंबईच्या वतीनं खेळताना ग्रीनला 'प्लेयर ऑफ द मॅच', 'मोस्ट वॅल्यूएबल असेट ऑफ द मॅच', 'गेम चेंजर ऑफ द मॅच', 'ऑन-द-गो फॉर्स' असे पुरस्कार देत त्याच्या खेळाची दाद देण्यात आली. ग्रीनला मिळालेल्या या पुरस्कारांसोबतच त्याला प्रत्येक पुरस्कारासाठी निर्धारित रक्कमही देण्यात आली. यासाठी प्रत्येक पुरस्काराचे एक लाख रुपये याप्रमाणे चार पुरस्कारांच्या 4 लाख रुपये इतक्या बक्षीसपात्र रकमेचा तो मानकरी ठरला.
कॅमरुन ग्रीन पहिल्यांदाच आयपीएलमध्ये खेळत असल्याचं म्हटलं जात आहे. आतापर्यंत त्यानं या पर्वामध्ये 5 सामने खेळले असून 99 धावा केल्या आहेत. हैदराबादविरोधात खेळल्या गेलेल्या सामन्यातील 64 धावांची खेळी ही त्याची आतापर्यंतची सर्वोत्तम खेळी ठरली आहे. फक्त फलंदाजीच नव्हे, तर गोलंदाजीतही पठ्ठ्यानं चांगलीच कामगिरी केली आहे. त्याच्या गोलंदाजीविषयी सांगावं तर, 20 धावा देत 1 गडी बाद करणं ही त्याची सर्वोत्तम कामगिरी ठरली आहे.
In Match 25 of #TATAIPL between #SRH & #MI
Here are the Visit Saudi Beyond the Boundaries Longest 6, Upstox Most Valuable Asset, Herbalife Active Catch of the match award winners.@VisitSaudi | #VisitSaudi | #ExploreSaudi@upstox | #InvestRight with Upstox@Herbalifeindia pic.twitter.com/BNl4vDIq2t
— IndianPremierLeague (@IPL) April 18, 2023
In Match 25 of #TATAIPL between #SRH & #MumbaiIndians
Here are the TIAGO.ev Electric Striker, Dream11 GameChanger & RuPay On-The-Go 4s of the match award winners. @Tatamotorsev | #Tiagoev | #Goev@Dream11 | #SabKhelenge@RuPay_npci | #RuPayCreditonUPI | #BeOnTheGo #SRHvMI pic.twitter.com/C3TPSdj6g0
— IndianPremierLeague (@IPL) April 18, 2023
आयपीएल आणि आर्थिक गणितं...
आयपीएलमध्ये येऊन आतापर्यंत बऱ्याच खेळाडूंनी दणदणीत कमाई केली आहे. त्यातच यंदाच्या वर्षी कॅमरून ग्रीनचंही नाव जोडलं जाताना दिसत आहे. आयपीएलमध्ये दरवर्षी कोट्यवधींच्या बक्षीसांची बरसात असते. यंदाचं वर्षही अपवाद नाही. आता मुख्य बाब अशी की, या संपूर्ण पर्वात सर्वाधिक रक्कम कोणाच्या खिशात जाते, कोणता संघ विजेचा ठरतो आणि कोण सर्वाधिक श्रीमंत खेळाडू.