IPL 2023 Playoffs : मुंबई आणि बंगळूरू दोन्ही टीम जिंकल्या तर...; कोणाला मिळणार प्लेऑफचं तिकीट?

Mumbai Indians : प्लेऑफमध्ये चौथं स्थान गाठण्यासाठी अजून स्पर्धा सुरु आहे. यामध्ये मुंबई आणि बंगळूरू या दोन्ही टीम्सना संधी आहे. आता प्लेऑफसाठी चौथ्या स्थानी कोण हे रविवारी रात्री स्पष्ट होणार आहे. 

Updated: May 21, 2023, 04:47 PM IST
IPL 2023 Playoffs : मुंबई आणि बंगळूरू दोन्ही टीम जिंकल्या तर...; कोणाला मिळणार प्लेऑफचं तिकीट? title=

Mumbai Indians : आयपीएल 2023 ( IPL 2023 ) आता शेवटच्या टप्प्यात आली आहे. रविवारी म्हणजेच आज रंगणारे दोन्ही सामने प्लेऑफच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत. यामधील पहिला सामना मुंबई इंडियन्स ( Mumbai Indians ) विरूद्ध सनरायझर्स हैदराबाद यांच्यात रंगणार आहे. तर दुसरा सामना रॉयल चॅलेंजर बंगळूरू ( Royal Challengers Bangalore ) विरूद्ध गुजरात टायटन्स ( Gujarat Titans ) यांच्यात होणार आहे. प्लेऑफमध्ये चौथं स्थान गाठण्यासाठी मुंबई आणि बंगळूरू या दोन्ही टीम्सना संधी आहे. मात्र आज होणाऱ्या सामन्यांमध्ये दोन्ही टीम्स जिंकल्या प्लेऑफचं ( IPL playoff scenarios ) तिकीट कोणाला मिळणार असा प्रश्न उपस्थित होतोय.

शनिवारी लखनऊ सुपर जायंट्स (Lucknow Super Giants) विरूद्ध कोलकाता नाईट राइडर्स (Kolkata Knight Riders) यांच्यामध्ये झालेल्या सामन्यात अवघ्या एका रनने कोलकात्याचा पराभव झाला. त्यामुळे प्लेऑफचं गणित बऱ्यापैकी सुटलं. यावेळी पहिल्या स्थानावर गुजरात टायटन्स ( Gujarat Titans ) , दुसऱ्या स्थानावर चेन्नई सुपर किंग्जची टीम असून तिसरं स्थान लखनऊ सुपर जाएंट्सने पटकावलं आहे. त्यामुळे आता प्लेऑफसाठी चौथ्या स्थानी कोण हे रविवारी रात्री स्पष्ट होणार आहे. 

आरसीबी आणि मुंबई दोन्ही टीम जिंकल्या तर...

मुंबई इंडियन्स यंदाच्या आयपीएलमधील त्यांचा शेवटचा साखळी सामना सनरायझर्स हैदराबादविरुद्ध ( Sunrisers Hyderabad ) खेळतेय. या सामन्यात मुंबईने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. यामुळे हैदराबादकडून मिळालेलं टार्गेट मुंबईला 12 ओव्हर्समध्ये पूर्ण करावं लागेल. 

जर मुंबई इंडियन्स ( Mumbai Indians ) असं करण्यात यशस्वी झाली नाही आणि आरसीबीने गुजरात टायटन्सविरुद्धचा शेवटचा साखळी सामना जिंकला तर बंगळूरूला प्लेऑफचं तिकीट मिळणार आहे. मुख्य म्हणजे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला मुंबई इंडियन्सविरुद्धच्या ( Mumbai Indians ) सामन्यानंतर सामना खेळायचा आहे. त्यामुळे आरसीबीला याचा फायदा होणार आहे कारण, या सामन्यात कोणत्या रणनीतीने खेळायचे आहे हे, त्यांना अगोदरच माहिती होणार आहे. 

आरसीबीचं रन रेट सध्याच्या घडीला 0.180 आहे तर मुंबई इंडियन्सचा नेट रनरेट -0.128 आहे. मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू या दोन्ही आज सामना जिंकला तर ज्या टीमचं रनरेट चांगलं असेल त्यांना प्लेऑफचं तिकीट मिळू शकणार आहे.