CSK vs LSG : ए माराsss! मराठमोळ्या ऋतुराज गायकवाड चा फिल्मी स्टाईल षटकार; कारवर पडला खड्डा

IPL 2023 CSK vs LSG: कुणाची होती ती कार? चित्रपटात दाखवतात आठवतंय का, दणदणीत षटकार मैदानाबाहेर थेट कारच्या काचा फोडतो... असंच काहीसं आयपीएलच्या सामन्यातही झालं. फलंदाज होता ऋतुराज गायकवाड... सामना होता चेन्नई विरुद्ध लखनऊ.   

सायली पाटील | Updated: Apr 4, 2023, 02:51 PM IST
CSK vs LSG : ए माराsss! मराठमोळ्या ऋतुराज गायकवाड चा फिल्मी स्टाईल षटकार; कारवर पडला खड्डा  title=
IPL 2023 News CSK vs LSG Ruturaj Gaikwad hits massive six left dents on car in stands

IPL 2023 CSK vs LSG Highlights: एखाद्या चित्रपटात जेव्हा क्रिकेट सामन्याचं दृश्य चित्रीत केलं जातं, तेव्हा त्यामध्ये काही गोष्टी हमखास दाखवल्या जातात. यामध्ये एखादा कमाल झेल, अप्रतिम Fielding, दमदार फलंदाजी आणि बऱ्याच गोष्टींचा समावेश असतो. या दमदार फलंदाजीचीसुद्धा विविध रुपं चित्रपटांमध्ये पाहायला मिळतात. जीवतोड धावा काढणारे, एकाच ठिकाणी उभं राहून फटकेबाजी करणारे असे फलंदाज पाहायला मिळतात. यामध्ये एक दृश्य बऱ्याचदा पाहायला मिळतं. ते म्हणजे पूर्ण ताकदीनं मारलेल्या आणि मैदानाबाहेर गेलेल्या षटकाराचं. 

फलंदाज पूर्ण ताकदीनं षटकार मारतो आणि चेंडू अटकेपार, थोडक्यात मैदानाबाहेर जाऊन कुणाच्या घराची, तर कुणाच्या कारची काच फोडतो. पाहायला आणि ऐकायला हे फारच फिल्मी वाटतंय ना? अहो हे प्रत्यक्षात घडलं आहे. 

हेसुद्धा वाचा : CSK vs LSG: सामना जिंकला पण 'कॅप्टन कूल' धोनीचा पारा चढला, नवख्या खेळाडूंना दिला अल्टीमेटम, म्हणाला...

कुठे...? आयपीएलच्या (IPL 2022) नुकत्याच पार पडलेल्या एका सामन्यात. जिथं चेन्नई सुपरकिंग्सच्या संघाला त्यांच्या सलामीवीरांनी दणक्यात सुरुवात करून दिली होती. लखनऊ सुपर जाएंट्स (Lucknow Super Giants) आणि (Chennai Superkings) चेन्नई सुपरकिंग्स या दोन्ही संघांमध्ये खेळल्या गेलेल्या सामन्यात ऋतुराजची फलंदाजी चर्चेचा विषय ठरली. 

सलामीवीरांनी गोलंदाजांना दमवलं... 

Devon Conway आणि ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) या जोडीनं लखनऊच्या गोलंदाजांच्या नाकी नऊ आणले. अवघ्या 28 चेंडूंमध्ये त्या दोघांनी मिळून 50 धावा ठोकल्या. इतकंच काय, तर पॉवरप्ले संपल्यानंतरही या जोडीनं लखनऊच्या गोलंदाजांना हैराण करणं सुरुच ठेवलं होतं. ऋतुराजनं कमाल खेळाचं प्रदर्शन करत सर्वांनाच आपली दखल घ्यायला भाग पाडलं. (IPL 2023 News CSK vs LSG Ruturaj Gaikwad hits massive six left dents on car in stands)

एका क्षणाला तर, त्यानं मारलेला षटकार इतका उंच आणि दूरवर गेला की तिथं डिसप्लेवर ठेवलेल्या (sponsorship car) स्पॉन्सरशिप कारवर जाऊन च्यानं भिरकावलेला चेंडू आदळला आणि कारला खड्डाच पडला. आता त्यानं मारलेला हा षटकार नेमका किती ताकदीनं होता याचा अंदाज तुम्हालाही आलाच असेल. 

IPL 2023 News CSK vs LSG Ruturaj Gaikwad hist massive six left dents on car in stands

31 चेंडू खेळणाऱ्या ऋतुराजनं मारलेला हा षटकार मैदानात सामना पाहण्यासाठी आलेल्या क्रिकटप्रेमींपासून विरोधी संघातील खेळाडूही पाहतच राहिले. या वादळी खेळीचा शेवट रवी बिष्णोईनं 10 व्या षटकात केला. जिथं ऋतूराज मार्क वूडला झेल देत तंबूत परतला. हो, पण त्याच्या या षटकारानं सोशल मीडियावर वादळ निर्माण केलं होते हे मात्र खरं.