IPL 2023: धोनीने हार्दिक पांड्याचा अहंकार दुखावला अन् पुढच्याच क्षणी..., मैदानातील VIDEO व्हायरल

IPL 2023: प्ले-ऑफमधील पहिल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सने (Chennai Super Kings) गुजरात टायटन्सचा (Gujarat Titans) पराभव करत अंतिम सामन्यात प्रवेश केला आहे. चेन्नईने गुजरातचा अत्यंत सहजपणे पराभव करत पराभवांचा वचपा काढला. दरम्यान कर्णधार हार्दिकला पांड्याला (Hardik Pandya) बाद करण्यासाठी महेंद्रसिंग धोनीने (Mahendra Singh Dhoni) चक्रव्यूह रचला होता. त्याचा व्हिडीओ (Viral Video) सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल झाला आहे.   

शिवराज यादव | Updated: May 24, 2023, 01:08 PM IST
IPL 2023: धोनीने हार्दिक पांड्याचा अहंकार दुखावला अन् पुढच्याच क्षणी..., मैदानातील VIDEO व्हायरल title=

IPL 2023: प्ले-ऑफमधील पहिल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सने (Chennai Super Kings) गुजरात टायटन्सचा (Gujarat Titans) पराभव करत अंतिम सामन्यात प्रवेश केला आहे. चेन्नईने 15 धावांनी गुजरातचा पराभव केला. चेन्नईने अटीतटीच्या वाटणाऱ्या सामन्यात अत्यंत सहजपणे गुजरातचा पराभव करत याआधी झालेल्या 3 पराभवांचा वचपा काढला. दरम्यान कर्णधार हार्दिकला पांड्याला (Hardik Pandya) बाद करण्यासाठी महेंद्रसिंग धोनीने (Mahendra Singh Dhoni) चक्रव्यूह रचला होता. त्याचा व्हिडीओ (Viral Video) सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल झाला असून चांगलीच चर्चा रंगली आहे. 

महेंद्रसिंग धोनी आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खेळत नसला तरी आयपीएलच्या माध्यमातून तो अद्यापही आपल्या नेतृत्व कौशल्याने चाहत्यांना भुरळ टाकत आहे. चेन्नई संघाचं नेतृत्व करताना धोनीने पुन्हा एकदा संघाला अंतिम फेरीत दाखल केलं आहे. गुजरातविरोधातील विजयात चेन्नईच्या सर्वच खेळाडूंनी मोलाचं योगदान दिलं. मात्र यावेळी धोनीने क्षेत्ररक्षणादरम्यान आखलेली रणनीती चर्चेचा विषय ठरत आहे. गुजरातचा कर्णधार हार्दिक पांड्याची विकेट घेण्यासाठी धोनीने त्याच्याशी माइंडगेम खेळला. त्याची ही रणनीती पाहून क्रिकेटविश्व पुन्हा एकदा त्याची स्तुती करत आहे.

चेन्नईने गुजरातचा पराभव केल्याने थेट अंतिम सामन्यात पोहोचले आहेत. तर दुसरीकडे गुजरातला मात्र आता आणखी एक सामना खेळावा लागणार आहे. मुंबई आणि लखनऊमधील विजेत्या संघासह गुजरात भिडणार आहे. चेन्नईचा संघ गेल्या आयपीएलमध्ये 9 व्या स्थानावर राहिले होते. पण यावेळी चेन्नईच्या खेळाडूंनी दमदार कामगिरी केली. या आयपीएलमध्ये धोनी फलंदाजीत जास्त योगदान देऊ शकला नाही. मात्र चेन्नईच्या यशात त्याचं नेतृत्वकौशल्य फार महत्त्वाचं ठरत आहे. 

हार्दिक पांड्याशी माइंडगेम

हार्दिक पांड्या मैदानात असताना धोनीने जाणुनबुजून क्षेत्ररक्षणात बदल केले. हार्दिक पांड्याच्या मनात नेमकं काय आहे हे धोनीने हेरलं आणि त्यानुसार त्याने फिल्डर बदलला. धोनीच्या या रणनीतीचा फायदा झाला आणि हार्दिक पांड्याने थेट रवींद्र जाडेजाच्या हातात झेल सोपवला.

पहिल्या पाच ओव्हरमध्ये जलदगती गोलंदाजांना वापरल्यानंतर महेश तीक्षाणा याला 6 व्या ओव्हरला गोलंदाजीला आणलं. ही पॉवरप्लेमधील शेवटची ओव्हर होती. हार्दिकने यावेळी स्क्वेअरला चेंडू टोलवला. चेंडू मोइन अलीच्या बाजूने जाईल अशी त्याला आशा होती. पण चेंडू थेट रवींद्र जाडेजाच्या हातात गेला. यानंतर धोनीच्या रणनीतीची एकच चर्चा सुरु आहे. 

धोनीने रवींद्र जडेजाला बॅकवर्ड स्क्वेअरमधून बॅकवर्ड पॉइंटमध्ये आणले आणि पुढच्या चेंडूवर हार्दिकने टोलवलेला चेंडू थेट जडेजाच्या हातात गेला. पाहा व्हिडीओ

यावेळी समालोचन करणाऱ्या रवी शास्त्री यांनीही धोनीच्या रणनीतीचं कौतुक केलं. "धोनी येथे हार्दिकच्या अहंकाराशी खेळला," असं रवी शास्त्री म्हणाले. 

दरम्यान सामना संपल्यानंतर धोनीने आपण सतत क्षेत्ररक्षणात बदल करत असल्याने कर्णधार म्हणून खूप त्रासदायक ठरु शकतो हे मान्य केलं आहे. 

"तुम्ही विकेट पाहता आणि त्यानुसार क्षेत्ररक्षणात बदल करु शकता. मी खूप त्रासदायक कर्णधार असू शकतो, मी खेळाडूंना सारखा 2-3 फूटांवर हलवत राहतो. मी क्षेत्ररक्षकांना एकच विनंती करतो की, माझ्यावर लक्ष ठेवा. कॅच सोडल्यास माझ्याकडून कोणतीही प्रतिक्रिया येणार नाही, फक्त माझ्यावर लक्ष ठेवा," असं धोनीने सांगितलं.