IPL 2023 : अखेरच्या सामन्याआधी माहीच्या नशिबी हा कसला अजब योगायोग? पाहून तुम्हीही विचारात पडाल

IPL 2023 Final : देशात मान्सून आलाही नाही, पण मान्सूनपूर्व पावसानं बऱ्याच भागांमध्ये हजेरी लावल्यामुळं अनेकांचीच त्रेधातिरपीट उडाली आहे. अगदी आयपीएलसारखी स्पर्धाही या पावसाच्या तडाख्यातून सुटलेली नाही. त्यातच साधला गेला एक योगायोग... 

सायली पाटील | Updated: May 29, 2023, 09:14 AM IST
IPL 2023 : अखेरच्या सामन्याआधी माहीच्या नशिबी हा कसला अजब योगायोग? पाहून तुम्हीही विचारात पडाल  title=
IPL 2023, IPL 2023 Final, reserve day, weather in Ahmedabad, CSK Vs GT, Narendra Modi Stadium, IPL 2023 Final Update, where to watch IPL 2023 Final, IPL 29th May, MS Dhoni Last Match, chennai super kings, Gujarat Titans, चेन्नई सुपरकिंग्स, गुजरात टायटन्स,

IPL 2023 Final : 'थाला' महेंद्रसिंह धोनी Chennai Super Kings (CSK) च्या संघातून जेव्हाजेव्हा खेळण्यासाठी मैदानात येतो तेव्हातेव्हा त्याच्या संघाला पाठींबा देणाऱ्यांचा कल्ला असतोच. पण, इतर संघांना पाठिंबा देणारे क्रिकेटप्रेमीसुद्धा या खेळाडूसाठी एकत्र आल्याचे पाहायला मिळतात. असा हा माही आयपीएलमधील त्याचा 250 वा आणि बहुधा अखेरचा सामना खेळण्यासाठी सज्ज झाला आहे. खरंतर तो 28 मे रोजीच सज्ज झाला होता, पण पावसानं सर्वच मनसुबे चिंब भिजवले. ज्यामुळं आता रिजर्व्ह डे ला म्हणजेच 29 मे रोजी हा सामना होणार असल्याचं सांगण्यात आलं. 

सामना कोणीही जिंकू दे, पण माहिसाठी हे सर्वकाही अखेरचंच ठरणार आहे हे आता जवळपास निश्चीत होताना दिसत आहे. तुमहाला माहितीये का, जर हा माहिचा अखेरचा आयपीएल सामना असेल तर त्या निमित्तानं एक कमाल योगायोग साधला गेला आहे. काय आहे तो योगायोग? चला पाहूया.... 

माहीसाठी निसर्गानं साधला योगायोग 

हा योगायोग जाणून घेण्यासाठी तुम्हाला थोडं भूतकाळात जावं लागेल. जिथं माही शेवटच्या वेळी भारतीय संघाच्या वतीनं विश्वचषक स्पर्धेतील उपांत्य सामना माही (Mahendra singh Dhoni) खेळला होता. त्या सामन्यात भारतीय संघाला न्यूझीलंविरोधात पराभव स्वीकारावा लागला होता. जिथं धोनी धावबाद झाला होता. ज्यानंतर साधारण वर्षभरानंतरच 2020 मध्ये माहीनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून काढता पाय घेतला होता. त्या सामन्यात जे काही झालं, तसंच इथं आयपीएलमध्येही घडल्याचं पाहायला मिळालं. 

हेसुद्धा वाचा : ना दु:ख लपवता येईना ना अश्रू; Dressing room सोडताना Mumbai Indians चे खेळाडू भावूक, पाहा Video

 

2019 मधील विश्वचषक स्पर्धेतील उपांत्य सामन्यातही पावसानं अडथळा निर्माण केला होता. ज्यामुळं हा नॉकआऊट सामना रिजर्व्ह डे वर ढकलला गेला होता. आय़पीएलच्या अंतिम सामन्याच्या वेळीसुद्धा हेच चित्र पाहायला मिळालं. जिथं मूळ सामन्याच्या दिवशीच पावसानं चित्रच पालटलं. ज्यामुळं आता पावसानं पुन्हा आडकाठी न घातल्यास हा सामना 29 मे रोजी पार पडेल. त्यावेळी जेव्हा माही आंतरराष्ट्रीय क्रिकेटला निरोप देण्याच्या मनस्थितीत होता तेव्हाही पावसाची हजेरी होती आणि आता तो (IPL 2023) आयपीएलमधून काढता पाय घेणार आहे तेव्हाही निसर्गानं पुन्हा तसाच काहीसा योगायोग घडवून आणला आहे. त्यामुळं हा निसर्गही माहीवर तितकाच प्रेम करतो की काय... हाच निरागस प्रश्न क्रिकेटप्रेमी विचारत आहेत.