IPL 2023 Final : नरेंद्र मोदी स्टेडियमवर महिलेची पोलिसाला धक्काबुक्की आणि मारहाण; Viral Video पाहून बसेल धक्का

CSK vs GT IPL 2023 Final : रविवारी पावसामुळे आयपीएलच्या फायनल मॅचला ग्रहण लागलं. त्या दरम्यान नरेंद्र मोदी स्टेडियमवर एका महिला चाहत्याने पोलिसांना धक्काबुक्की आणि मारहाण केलाचा व्हिडीओ समोर आला आहे.

Updated: May 29, 2023, 07:28 AM IST
IPL 2023 Final : नरेंद्र मोदी स्टेडियमवर महिलेची पोलिसाला धक्काबुक्की आणि मारहाण; Viral Video पाहून बसेल धक्का  title=
Female fan slaps a police officer in stands at Narendra Modi Stadium during IPL 2023 Final video viral on social media Trending google News

IPL 2023 Final Viral Video : चेन्नई सुपर किंग्ज आणि डिफेन्डिंग चॅम्पियन गुजरात टायटन्स (CSK vs GT) यांच्यातील आयपीएल 2023 चा फायनल सामना रविवारी पावसामुळे रद्द झाला. IPL 2023 चा चॅम्पियन कोण आहे हे आज ठरणार आहे. अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर (Narendra Modi Stadium, Ahmedabad) चाहत्यांची निराशा झाली. यादरम्यान स्टँडमधील एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे. या व्हिडीओमध्ये एक महिला पोलीस कर्मचाऱ्याला धक्काबुक्की आणि मारहाण करताना दिसत आहे.  

हा व्हिडीओ सोशल मीडियावर सगळ्यांचं लक्ष वेधून घेत आहे. ऑन ड्युटी असताना महिलेने पोलीस कर्मचाऱ्याचा अपमान केला आहे. खरं तर नेमकं काय घडलं? महिलेला एवढं संतापायला काय झालं? हे काही समजलं नाही आहे. पण हा व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल होतो आहे. 

या व्हिडीओमध्ये स्टँडमध्ये आयपीएलची फायनल मॅच पाहण्यासाठी चाहत्यांनी खचाखच भरलेलं आहे. अशातच एका महिलेच्या शेजारी पोलीस कर्मचारी बसलेला दिसत आहे. अचानक ती महिला उठते आणि त्या पोलीस कर्मचाऱ्याला शिवीगाळ करायला लागते. त्याला धक्काबुक्की करत मारहाण करतानाही ती दिसत आहे. स्टँडमधील इतर प्रेक्षक हे भांडण पाहत आहे. (Female fan slaps a police officer in stands at Narendra Modi Stadium during IPL 2023 Final video viral on social media Trending google News )

त्या महिलेने पोलीस कर्मचाऱ्याला धक्का दिल्यावर तो इतर प्रेक्षकांवर जाऊन पडला. त्यानंतर तो उठून तिथून जात असताना महिलेने पुन्हा त्याला धक्का मारला. त्यामुळे तो पोलीस कर्मचारी इथे असलेल्या एका व्यक्तीवर जाऊन पडला. यामुळे तो व्यक्तीही त्या महिला आणि पोलीस कर्मचाऱ्यावर वैतागला. त्या व्यक्तीच्या सोबत असलेल्या महिलेने आणि एका दुसऱ्या प्रेक्षकाने त्याला वाद घालण्यापासून रोखलं. 

हा व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्वीटर आणि इन्स्टाग्रामवर व्हायरल होतो आहे. बऱ्याच यूजर्सने महिलेच्या या कृत्यावर आक्षेप घेतला आहे. महिलेवर कारवाई करण्याची मागणी यूजर्सने केली आहे. पण या व्हिडीओमागील सत्य अद्याप समोर आलेले नाही. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

हा व्हिडीओ ट्विटरवर TheNaziLad या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. त्याशिवाय इन्स्टाग्रामवर sportstiger_official यावर पोस्ट केला आहे. 

दरम्यान ऑन ड्युटी असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की मारहाण करणे हा गुन्हा आहे. भारतीय दंड संहितेच्या कलम 186 म्हणजेच IPC-1860 अंतर्गत त्या व्यक्तीवर कारवाई केली जाते. त्याशिवाय  एक महिन्याचा तुरुंगवास किंवा ₹ 500 दंड किंवा दोन्ही शिक्षा मिळू शकतात.