"मला ते करावे लागले तर..." विराट - गौतममधील वाद मिटवण्यासाठी 'ही' व्यक्ती पुढाकार घेण्यास तयार

Kohli Gambhir Fight: आयपीएल सुरु झाल्यापासून सोमवारी (01 May 2023) झाला सामना सर्वात अधिक गाजतोय. कारणही तसंच आहे, या आयपीएलमधील सगळ्यात मोठा राडा या सामन्यात झाला. दोन दिग्गज खेळाडू गौतम गंभीर (Gautam Gambhir) आणि विराट कोहली (Virat Kohli) एकमेकांशी भिडले. 

नेहा चौधरी | Updated: May 3, 2023, 10:08 AM IST

IPL 2023 Kohli Gambhir Fight :  यंदाचा आयपीएलमधील (IPL 2023 ) सर्वात मोठ्या वादाने गेल्या तीन दिवसांपासून क्रिकेट जगतात चर्चा रंगली आहे. सोमवारी (01 May 2023) बंगळुरु (Royal Challengers Bangalore) आणि लखनऊ (Lucknow Super Giants) सामना हा खेळाडूंचा खेळीमुळे नाही तर दोन खेळाडूंचा शिवीगाळ आणि वादावादीने रंगला. मैदानात क्रिकेटसोबत विराट कोहली (Virat Kohli) आणि गौतम गंभीर (Gautam Gambhir) यांची तूतू मैमै झाली. या घटनेच्या व्हिडीओ पुढच्या सेकंदला सोशल मीडियाच्या सर्व प्लॅटफॉर्मवर व्हायरल झाला. 

भारतीय क्रिकेट विश्वात विराट कोहली आणि गौतम गंभीर हे मोठी नावं आहेत. या दोघांमधील अनेक वाद हे कायम चर्चेत राहिले आहे. आयपीएलमध्ये तर जणू या दोघांचा वादाचा अख्खा इतिहासच आहे. आयपीएलमध्ये लखनऊ (Lucknow Super Giants) ही गौतम गंभीरच्या नेतृत्त्वात खेळते. तर बंगळुरु (Royal Challengers Bangalore) चं नेतृत्त्व विराट कोहली करतो. 

 नेमकं काय झालं?

गेल्या तीन दिवसांपासून या दोघांमधील वाद चर्चेचा विषय बनला आहे. एवढंच नाही तर मैदानातील हा वाद सोशल मीडियावर पोहोचला आहे. विराट कोहली सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक स्टेट्स ठेवलं त्यानंतर या वादाला अजून तोंड फुटलं. शिवाय या खेळाडूमुळे हा वाद झाला त्यानेही एक स्टेट्स ठेवलं.

खरं तर हा वाद विराट कोहली आणि गौतम गंभीरमधील नव्हतात. हा वाद खरं तर लखनऊचा खेळाडू नवीन-उल-हक आणि विराट कोहलीमधील आहे. या दोघांच्या वादातनंतर गौतम गंभीरने उडी घेतली. अशात नवीन-उल-हक हा अफगाणिस्तानचा खेळाडू बाजूला राहिला आणि दोन भारतीय खेळाडू एकमेकांशी भिडले. 

'ही' व्यक्ती पुढाकार घेण्यास तयार

दरम्यान भारताचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी गौतम आणि विराटमधील वादा सोडण्यासाठी मध्यस्थी करण्यास तयार असलेल्याचं दर्शविलं आहे. रवी शास्त्री म्हणतात की, ''हे दोघे दिल्लीतून आले आहेत. त्याशिवाय हे दोघे भारताचे स्टार खेळाडू आहेत. वर्ल्डकपमध्येही या दोघांनी उत्तम कामगिरी केली आहे. त्यामुळे या दोघांनी हा वाद संपवला पाहिजे. त्यासाठी दोघांपैकी कोणीही हा वाद मिटवला पाहिजे.''

''हा वाद संपविण्यासाठी जो कोणी पुढाकार घेईल ते सर्वात चांगलं होईल. क्रिकेट विश्वात आपण एकमेकांशी वरच्यावर भेटतो. एकमेकांशी बोलावं पण लागलं. असा वाद ठेवून पुढे जाणं योग्य नाही. जर या दोघांमधील वाद मिटविण्यासाठी मला पुढाकार घ्यावा लागला तर मी तो घेईल.'' 

आयपीएलच्या आचारसंहितेचा भंग केल्याबद्दल दोघांनाही मंगळवारी त्यांच्या मॅच फीच्या 100 टक्के दंड ठोठावण्यात आला आहे.