MS Dhoni IPL 2023 : आयपीएलचा (IPL 2023) सोळावा हंगाचा लिलाव नुकताच पार पडलाय आणि आता क्रिकेट चाहत्यांना उत्सुकता आहे ती स्पर्धेची. विशेषत: चेन्नई सुपर किंग्जचे (Chennai Super Kings) चाहते या स्पर्धेची आतुरतेने वाट पाहातायत. कारण यंदाची आयपीएल स्पर्धा महेंद्रिस सिंग धोणीची (M S Dhoni) शेवटची आयपीएल स्पर्धा असू शकते. त्यामुळे यंदाच्या आयपीएल चषकावर चेन्नई सुपर किंग्सने आपलं नाव कोरावं अशी प्रार्थना चाहते करतायत.
चेन्नई सुपर किंग्सला धक्का
पण आयपीएल स्पर्धा सुरु होण्याच्या आधीच चेन्नई सुपर किंग्जला मोठा धक्का बसला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सुरुवातीचे तीन ते चार सामने एम एस धोणी खेळू शकणार नाही. या गोष्टीमुळे चेन्नईचे चाहत्यांमध्ये काहीसं नाराजीचं वातावरण आहे.
चेन्नईच्या विजयात धोणीचा वाटा
आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्सच्या यशात सर्वात मोठा वाटा आहे तो कर्णधार एम एस धोणीचा. धोणीच्या नेतृत्वाखाली चेन्नईने (CSK) तब्बल चार वेळा जेतेपद पटकावलं आहे. 2010, 2011, 2018 आणि 2021 अशा चार वेळा चेन्नईने आयपीएल स्पर्धा जिंकण्याची कमाल केली आहे. विशेष म्हणजे 2008 च्या पहिल्या हंगामापासून आतापर्यंत चेन्नई संघाचा एमएस धोणी हा एकमेव कर्णधार आहे. आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा अंतिम फेरीत पोहोचलेला चेन्नई हा एकमेव संघ आहे.
सुरुवातीच्या सामन्यांना धोणी मुकणार
यंदाही चेन्नई सुपर किंग्ज धोणीच्या नेतृत्वात पाचव्यांदा आयपीएलची ट्रॉफी जिंकण्यासाठी सज्ज झाली आहे. यंदाची आयपीएल ही धोणीची शेवटची स्पर्धा असू शकते असं बोललं जात आहे. त्यामुळे यंदाची आयपीएल स्पर्धा चेन्नईने जिंकून धोणीला विजयाचं गिफ्ट द्यावं अशी अपेक्षा चाहते बाळगून आहेत. पण धोणीच्या चाहत्यांसाठी एक निराशाजनक बातमी आहे. सुरुवातीच्या काही सामन्यांना धोणी मुकण्याची शक्यता आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार धोणीला कंबर दुखीचा त्रास (Dhoni's Injury) आहे. डॉक्टरांनी त्याला 2 ते अडीच महिने विश्रांतीचा सल्ला दिला आहे. त्यामुळे चार ते पाच सामने धोणी खेळू शकणार नसल्याची माहिती आहे. धोणी आयपीएल स्पर्धेपूर्वी बरा व्हावा आणि पुन्हा मैदानात उतरावा अशी प्रार्थना त्याचे चाहते करतायत.
CSK टीम आईपीएल 2023
विकेटकीपर: एमएस धोनी, डेवोन कॉनवे (न्यूझीलंड)
फलंदाज : ऋतुराज गायकवाड, अंबाती रायडू, सुभ्रांशु सेनापति, शैक रशीद, अजिंक्य रहाणे
ऑलराउंडर: मोइन अली (इंग्लंड), शिवम दूबे, राजवर्धन हंगेरगेकर, रवींद्र जडेजा, ड्वेन प्रिटोरियस (दक्षिण आफ्रीका), मिचेल सेंटनर (न्यूझीलंड), बेन स्टोक्स (इंग्लंड), काइल जॅमीसन (न्यूझीलंड), अजय मंडल, भगत वर्मा, निशांत सिंधु
गोलंदाज : दीपक चाहर, तुषार देशपांडे, मुकेश चौधरी, मथीशा पथिराना (श्रीलंका), सिमरजीत सिंह, प्रशांत सोलंकी, महेश थीक्षणा (श्रीलंका)