Sachin Tendulkar: "शतक ठोकलंच पाहिजे...", लाडक्या मित्राच्या बर्थडेला Raj Thackeray यांची खास पोस्ट चर्चेत!

सचिनच्या (Sachin Tendulkar Birthday) वाढदिवसानिमित्त आज अनेक शुभेच्छांचा वर्षाव होताना दिसतोय. या शुभप्रसंगी मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी देखील एक पोस्ट शेअर करत सचिनला शुभेच्छा दिल्या आहेत.

Updated: Apr 24, 2023, 06:00 PM IST
Sachin Tendulkar: "शतक ठोकलंच पाहिजे...", लाडक्या मित्राच्या बर्थडेला Raj Thackeray यांची खास पोस्ट चर्चेत! title=
Sachin Tendulkar 50th birthday, Raj Thackeray

Raj Thackeray On Sachin Tendulkar: कुरळ्या केसांचा सचिन कधी मोठा झाला कळालं देखील नाही. अवघ्या क्रिकेटप्रेमींवर पोरानं राज्य केलं. तो 'शतकांचा सम्राट' झालाच, त्याचबरोबर 'क्रिकेटचा देव'ही. एवढं सर्व मिळवताना तो एकटा झुंज देत उभा होता...मॉन्स्टररररर.., विरोधी संघात देखील ज्याच्या पराक्रमाचं कौतूक होतं, असा सचिन आज 50 वर्षांचा झालाय. मराठमोठ्या सचिनने नेहमी जमिनीवर पाय ठेवले. त्यामुळे आज त्याची ख्याती सर्वजगात आहे. अशाच या सचिनच्या (Sachin Tendulkar Birthday) वाढदिवसानिमित्त आज अनेक शुभेच्छांचा वर्षाव होताना दिसतोय. या शुभप्रसंगी मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी देखील एक पोस्ट शेअर करत सचिनला शुभेच्छा दिल्या आहेत.

काय म्हणाले Raj Thackeray? 

सचिन तेंडुलकरने आज अवघी पन्नाशी पूर्ण केली. या अवाढव्य देशाच्या हृदयाचे ठोके एकाच क्षणाला थांबवायची किंवा एकत्र अख्ख्या देशाने ज्याच्यावर जीव ओवाळून टाकावा, अशी ताकद ज्या माणसाने निर्माण केली तो आपला सचिन. आकाशाला गवसणी घालणारं अफाट असं यश मिळवून देखील जमिनीला घट्ट पाय ठेवणाऱ्या माझ्या मित्राला वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा. सचिनने शतक ठोकलंच पाहिजे अशी कायमच इच्छा किंवा अपेक्षा असते, ही इच्छा किंवा अपेक्षा सचिन तू पूर्ण करशीलच, असं राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी पोस्ट करत म्हटलं आहे.

पाहा पोस्ट 

अनेक क्षेत्रातील दिग्गजांनी आज सचिनच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव केलाय. सचिनचं भारतीय क्रिकेट तसेच जागतिक क्रिकेटमधील योगदान वादादीत आहे. प्रतिभावान, कठोर परिश्रम आणि ध्येयनिश्चित अशा सचिनने आज हाफ सेंच्यूरी पूर्ण केलीये. आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम ठोकून आज 10 वर्ष पूर्ण झालीत, तरी देखील सचिन मैदानावर दिसताच, सचिsssन...सचिsssन  असा वरचा स्वर नेहमी ऐकायला मिळतो. जणू काही अख्खं मैदान क्रिकेटच्या देवाचा जप करत आहे.

आणखी वाचा - Sachin Tendulkar कडून 50 व्या वाढदिवसानिमित्त खास Video शेअर; तुम्हीही पाहा 'तो' दिवस...

दरम्यान, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके झळकावण्याचा विश्वविक्रम सचिन तेंडुलकरच्या नावावर आहे. 'भारतरत्न' या सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित सचिनचा रेकॉर्ड मोडणं येड्यागबाळ्याचं काम नक्कीच नाही. सचिनने आज अर्धशतक पूर्ण केलंय. मात्र, त्याने शतक देखील पूर्ण करावं, अशी इच्छा सर्वजण करत आहेत.