Virat Kohli Fined: आयपीएलकडून विराट कोहलीवर मोठी कारवाई, नेमकं प्रकरण काय?

RCB vs CSK, Virat Kohli Fined: आयपीएलच्या 2023 च्या 24 व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज सामना पार पडला. या सामन्यामध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा पराभव झाला असून आयपीएलकडून विराट कोहली वर मोठी कारवाई करण्यात आली. नेमकं प्रकरण काय आहे ते जाणून घेऊया...

श्वेता चव्हाण | Updated: Apr 21, 2023, 10:02 AM IST
Virat Kohli Fined: आयपीएलकडून विराट कोहलीवर मोठी कारवाई, नेमकं प्रकरण काय?  title=
IPL 2023, Virat Kohli fined

Virat Kohli Fined For Breaching IPL Rule: सोमवारी (17 एप्रिल 2023) चेन्नई सुपर किंग्ज (CSK vs RCB) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोर यांच्यातील सामना पार पडला. या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (Royal Challengers Bangalore) यांना पराभवाचा सामना करावा लागला. या संघाला आणखी एक धक्का बसला आहे तो म्हणजे, विराट कोहलीवर (Virat Kohli) आयपीएलचे कोड ऑफ कडंक्टच उल्लंघन केल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली आहे. त्यानुसार विराटला 10 टक्के मॅच फी कट करण्यात येणार आहे.

विराटवर कारवाई

आयपीएलच्या (ipl 2023) निवेदनात म्हटले आहे की, कोहलीने आयपीएल आचारसंहितेच्या कलम 2.2 अंतर्गत नियमांचे उल्लंघन केले. निवेदनात मात्र कोहलीला कोणत्या घटनेसाठी दंड ठोठावण्यात आला होता हे स्पष्ट केलेले नाही. चेन्नई सुपर किंग्जचा मधल्या फळीतील फलंदाज शिवम दुबेला बाद केल्याचे कोहलीने अतिउत्साही रीतीने साजरा केला. या त्याच्या आक्रमक सेलिब्रेशवर आक्षेप घेत विराटवर कारवाई करण्यात आली. शिवम दुबेने पारनेलच्या बॉलवर सिराजच्या हातात कॅच दिली होती.

या खेळाडूंवर कारवाई

कोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधार नितीश राणा (Nitish Rana) मुंबई इंडियन्सविरुद्धच्या (MI) सामन्यात आयपीएलच्या आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी दोषी  ठरवण्यात आले होते. त्यामुळे प्रत्येक मॅच फीच्या 25 टक्के दंड हा ठोठावला आहे. राणाला आयपीएल आचारसंहिता 2.21 अंतर्गत लेव्हल 1 वर दोषी ठरवले गेले. तर मुंबई इंडियन्सच्या हृतिक शोकीनला 10 टक्के दंड ठोठावण्यात आला होता. सामन्यादरम्यान नितीश आणि शोकीन यांच्यात वाद झाला असता. शौकीनला आयपीएल आचारसंहिता 2.5 लेव्हल वन अंतर्गत दोषी ठरवण्यात आले असते.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by IPL (@iplt20)

रविचंद्रन अश्विनही दोषी

रविचंद्रन अश्विन हा आयपीएल आचारसंहिता 2.7 अंतर्गत दोषी ठरला होता. त्यामुळे प्रत्येक मॅच फीच्या 25 टक्के दंड ठोठावला होता. चेन्नईविरुद्धच्या सामन्यात अश्विन अंपायरच्या निर्णयावर नाराज झाला होता. सामन्यात अंपायरने अचानक चेंडू बदलला असता तर अशीच परिस्थिती झाली असती. अश्विनने या अंपायरच्या या निर्णयाला विरोध केला होता. त्यामुळे त्याच्यावर कारवाई करण्यात आली होती.