IPL Auction 2023 : ऑक्शनसाठी 991 खेळाडू इच्छूक, कोण होणार मालमाल?

ऑक्शनसाठी  (ipl 2023 auction) नोंदवलेल्या 991 खेळाडूंपैकी 277 विदेशी खेळाडू आहेत. 

Updated: Dec 1, 2022, 11:08 PM IST
IPL Auction 2023 : ऑक्शनसाठी 991 खेळाडू इच्छूक, कोण होणार मालमाल? title=

मुंबई : आयपीएलच्या 16 व्या मोसमासाठी (ipl 2023 auction) अजूनही बराच वेळ आहे. मात्र या 16 व्या मोसमासाठीचा मिनी ऑक्शन लवकरच पार पडणार आहे. कोच्चीमध्ये येत्या 23 डिसेंबरला मिनी ऑक्शन पार पडणार आहे. या मिनी ऑक्शनसाठी 991 खेळाडूंनी आपलं नाव नोंदवलं आहे. त्यामुळे कोणत्या खेळाडूंना लॉटरी लागणार आणि कोण कमनशिबी ठरणार याचा निर्णय 23 डिसेंबरला लागणार आहे.  (ipl 2023 auction total 991 players register his name for mini auction)

मिनी ऑक्शनसाठी 991 खेळाडूंनी आपलं नाव नोंदवलं आहे. ऑकशनसाठी नोंदवलेल्या 991 खेळाडूंपैकी 277 विदेशी खेळाडू आहेत. तर 714 भारतीय खेळाडू आहेत. त्यातही 19 जण हे कॅप्ड खेळाडू आहेत म्हणजेच ते टीम इंडियासाठी खेळलेत. याबाबतची माहिती आयपीएलने मॅनेजमेंटने ट्विट करत दिली आहे. या मिनी ऑक्शनबाबत आपण सविस्तर जाणून घेऊयात.

या एकूण खेळाडूंपैकी 20 खेळाडू हे असोसिएट देशाचे आहेत. असोसिएट म्हणजे आयसीसीकडून संपूर्णरित्या संघाचा दर्जा न मिळालेला संघ. 

91 भारतीय अनकॅप्ड खेळाडू असेही आहेत, जे आयपीलच्या गत मोसमातही खेळले होते. तसेच 3 अनकॅप्ड परदेशी खेळाडूंचा समावेश आहे. हे देखील गेल्या मोसमात खेळले आहेत. 

महत्त्वाची गोष्ट म्हणजे आयपीएलमध्ये एकदाही न खेळलेल्या अनकॅप्ड भारतीय खेळाडूंचा आकडा हा 604 आहे. तर परदेशी खेळाडूंची हीच संख्या 88 इतकी आहे.  आयपीएलच्या नियमांनुसार, प्रत्येक टीम आपल्या गोटात जास्तीत जास्त 25 खेळाडू ठेवू शकते.