Mumbai Indians Chennai Super Kings: आगामी आयपीएल 2023 म्हणजेच 16 व्या हंगामासाठी मिनी लिलाव (IPL 2023 Mini Auction) येत्या 23 डिसेंबरला कोची इथे होणार आहे. या लिलावाआधी प्रत्येक फ्रँचायजीला रिटेन आणि रिलीज खेळाडूंची यादी 15 नोव्हेंबरपर्यंत द्यावी लागणार आहे. त्यामुळे आता IPL 2023 स्पर्धेसाठी मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) आणि चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) या संघांनी बीसीसीआयला (BCCI) रिलीज आणि रिटेन केलेल्या खेळाडूंची यादी पाठवल्याची माहिती मिळाली आहे.
महेंद्रसिंह धोनी, रवींद्र जडेजा, मोइन अली, शिवम दुबे, ऋतुराज गायकवाड, डेवोन कॉनवे, मुकेश चौधरी, ड्वेन प्रिटोरियस आणि दीपक चाहर या खेळाडूंना रिटने करण्यात आलंय.
क्रिस जॉर्डन, एडम मिल्ने, नारायण जगदीसन आणि मिशेल सेंटनेर (रॉबिन उथप्पा आणि अंबाती रायडू यांनी राजीनामा दिलाय.)
रोहित शर्मा, डेवाल्ड ब्रेविस, ईशान किशन, सूर्यकुमार यादव, डेनियल सॅम्स, टिम डेविड, जोफ्रा आर्चर, जसप्रीत बुमराह, ट्रिस्टन स्टब्स आणि तिलक वर्मा
फेबियन एलन, कीरोन पोलार्ड, टाइमल मिल्स, मयंक मार्कंडे आणि ऋतिक शौकीन
दरम्यान, रॉयल चॅलेजर्स बंगलुरू कडून सिद्धार्थ कौल, कर्ण शर्मा, डेविड विली, आकाश दीप या चार खेळाडूंना डच्चू मिळण्याची शक्यता आहे. तर दिल्ली कॅपिटल्स शार्दुल ठाकूरला रिलीज करण्याची शक्यता वर्तविली जात आहे. तर गुजरात मैथ्यू वेडला टाटा गुड बाय करण्याची देखील चर्चा सुरू आहे.