कॅनबेरा : इंग्लंड विरुद्ध पाकिस्तान (England Vs Pakistan) यांच्यात रविवारी 13 नोव्हेंबरला टी 20 वर्ल्ड कपचा फायनल (T 20 World Cup 2022) सामना रंगणार आहे. इंग्लंडने समी फायनलमध्ये टीम इंडियावर 10 विकेट्सने विजय मिळवला. टीम इंडियाचा या पराभवासह वर्ल्ड कपमधील प्रवास संपला. यानंतर इंग्लंडचा कर्णधार जॉस बटलरने (Jos Buttler) फायनलआधी मोठी भविष्यवाणी केली आहे. टीम इंडियाचा (Indian Cricket Team) स्टार युवा खेळाडू 'प्लेअर ऑफ द टुर्नामेंट' (Player Of The Tournament) या ट्रॉफीचा दावेदार असल्याचं बटलरने सांगितलंय. (t 20 world cup 2022 team india suryakumar yadav may win player of the tournament england captain jos buttler predicted)
टीम इंडियाचा सूर्यकुमार यादव 'प्लेअर ऑफ द टुर्नामेंट' ठरेल अशी भविष्यवाणी बटलरने केली आहे. सूर्यकुमारने वर्ल्ड कपच्या सुरुवातीपासून शानदार कामगिरी केली आहे. सूर्याने टीम इंडियासाठी निर्णायक क्षणी चांगली खेळी केली. सूर्याने वर्ल्ड कपमध्ये 189.68 च्या स्ट्राईक रेटने 239 धावा केल्या आहेत. सूर्या या टी 20 वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे.
"मला वाटतं सूर्यकुमार बिंधास्तपणे खेळलाय. अनेक दिग्गज खेळाडू असलेल्या संघात असताना सूर्याने शानदार कामगिरी केली", असं बटलर वर्ल्ड कप फायनलच्या पूर्वसंध्येला म्हणाला.
दरम्यान आयसीसीने 'प्लेअर ऑफ द टुर्नामेंट' या एका पुरस्कारासाठी एकूण 9 खेळाडूंची निवड केली आहे. यामध्ये इंग्लंडच्या 3, टीम इंडिया-पाकिस्तानच्या प्रत्येकी 2 आणि श्रीलंका-झिंबाब्वेच्या प्रत्येकी 1 खेळाडूचा समावेश आहे. या यादीत सूर्यकुमारसह विराच कोहलीचाही समावेश आहे. यामुळे बटलरची भविष्यवाणी खरी ठरणार की दुसरा कोणता खेळाडू 'प्लेअर ऑफ द टुर्नामेंट' हे पुढील काही तासांमध्येच स्पष्ट होईल.