मुंबई : आयपीएलच्या 15 व्या मोसमाचं (IPL 2022) महाराष्ट्रातील 4 स्टेडियममध्ये आयोजन करण्यात आलं आहे. आतापर्यंत या मोसमातील एकूण 15 सामन्यांचं यशस्वीरित्या आयोजन करण्यात आलंय. मात्र दुसऱ्या बाजूला आयपीएल गव्हर्निंग काऊन्सिलला मोठा फटका बसला आहे. आयपीएलच्या दुसऱ्या आठवड्या टीव्ही दर्शकांच्या संख्येत मोठी घसरण झाली आहे. अहवालानुसार, दुसऱ्या आठवड्यातील व्ह्यूअरशिपमध्ये एकूण 33 टक्क्यांनी घट झाल्याचं समजत आहे. टीव्हीवरुन आयपीएल पाहणाऱ्या क्रिकेट चाहत्यांचा मोठा वर्ग आहे. टीव्ही दर्शक हे आयपीएलची मोठी संपत्ती आहे. (ipl 2022 tv ratings big blow to ipl 33 percentage drop in viewership)
टीआरपी मोजणाऱ्या बीएआरसीच्या अहवालानुसार, पहिल्या आठवड्याच्या तुलनेत आयपीएल दर्शकांची संख्या ही 3.57 दशलक्षऐवजी 2.52 दशलक्ष इतकी होती.
ही टीआरपीची आकडेवारी पहिल्या आठवड्यातील एकूण रिच 267 मिलिअनवरुन 14 टक्क्यांनी घट झाली. त्यामुळे ही आकडेवारी 229 मिलियनपर्यंत आली आहे. बीएआरसी किमान एक मिनिट आयपीएल पाहणाऱ्या दर्शकाचा यूजर म्हणून गणना करतो. आतापर्यंत आयपीएलच्या व्हिवअरशिप ही मोसातील पहिल्या आठवड्यापासून ते शेवटपर्यंत कायम रहायची.
या 15 व्या हंगामात चेन्नई विरुद्ध कोलकाता यांच्यात सलामीचा सामना खेळवण्यात आला. तसेच या मोसमाच्या पहिल्या आठवड्यातील रविवारी पंजाब विरुद्ध बंगळुरु सामना पार पडला. या दोन्ही सामन्यांनीच 100 मिलियन यूझर्सचा आकडा पार केला.
पहिल्यांदाच आयपीएलच्या व्हिवयरशिपमध्ये पहिल्या आठवड्यात 33 टक्के घट झाली. आयपीएल 2023 ते 27 पर्यंत या एकूण 5 मोसमाच्या ब्रॉडकास्टिंग राईट्ससाठी बोली लावण्यात येणार आहेत. बोर्डाने आगामी 5 मोसमांसाठी मीडिया आणि ब्रॉडकास्टिंग राइट्ससाठी तब्बल 33 हजार कोटी इतरी रक्कम ठरवली आहे.