आयपीएलची हवा ओसरली? चाहत्यांकडून सलग चौथ्यांदा जोरदार झटका

आयपीएलचा 15 व्या मोसम (IPL 2022) रंगतदार स्थितीत आहे. प्लेऑफसाठी 8 संघांमध्ये कडवी झुंज पाहायला मिळतेय.

Updated: May 7, 2022, 06:43 PM IST
 आयपीएलची हवा ओसरली? चाहत्यांकडून सलग चौथ्यांदा जोरदार झटका title=

मुंबई : आयपीएलचा 15 व्या मोसम (IPL 2022) रंगतदार स्थितीत आहे. प्लेऑफसाठी 8 संघांमध्ये कडवी झुंज पाहायला मिळतेय. एका बाजूला हा थरार सुरु असताना दुसऱ्या बाजूला मात्र आयपीएलला मोठा झटका बसला आहे. हा धक्का दुसऱ्या तिसऱ्या कोणी दिला नसून चक्क क्रिकेट चाहत्यांनी दिली आहे. (ipl 2022 tv rating is decresed by record number) 

आयपीएलच्या 15 व्या हंगामाच्या सुरुवातीपासूनच टीव्ही रेटिंग ब्रॉडकास्टरसाठी चिंतेचा विषय बनला आहे. आता IPL 2022 च्या चौथ्या आठवड्याचे रेटिंग आले आहेत. हे आकडे फारसे चांगले नाहीत. 
 
रिपोर्टनुसार, आयपीएल 2022 च्या चौथ्या आठवड्यातील टीव्ही रेटिंग 35 टक्क्यांनी कमी झाले आहेत. आयपीएलच्या इतिहासात इतके कमी टीव्ही रेटिंग कधीच नव्हते. 

यावेळी बहुतांश सामन्यांचं आयोजन हे संध्याकाळीच करण्यात आलं. असं असूनही टीव्ही रेटिंगमध्ये एवढी मोठी घसरण ही चिंतेची बाब आहे. चॅनेल टीव्ही रेटिंग पाहिली तर स्टार स्पोर्ट्स-1 हिंदी चौथ्या क्रमांकावर आहे. पहिल्या चार आठवड्यांमध्ये आयपीएलच्या एकूण टीव्ही रेटिंगमध्ये 30 टक्क्यांनी घट झाली आहे.
 
टीव्ही रेटिंगमध्ये सातत्याने घसरण होतेय. त्यामुळे बीसीसीआयकडूनही चिंता व्यक्त करण्यात आली होती.  टिव्ही रेटिंग खाली आले हे खरं असले तरी आयपीएलच्या लोकप्रियतेवर कोणताही परिणाम झालेला नाही", अशी प्रतिक्रिया आयपीएलचे चेअरमन ब्रिजेश पटेल यांनी दिली होती. "तसेच लोक आता ग्रृपमध्ये, हॉटेल आणि बारमध्ये मॅच पाहतात", असंही पटेल म्हणाले होते.