मुंबई : आयपीएलच्या 15व्या सीझननंतर (IPL 2022) टीम इंडिया दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी-20 मालिका खेळणार आहे. आगामी टी 20 वर्ल्ड कपच्या दृष्टीने टीम इंडियासाठी ही अतिशय महत्त्वाची मालिका आहे. कॅप्टन रोहित शर्माला (Rohit Sharma) आगामी T20 विश्वचषकासाठी (T20 World Cup) मजबूत संघ बनवायचा आहे. आयपीएलमध्ये एक खेळाडू शानदार गोलंदाजी करतोय. या गोलंदाजाला आगामी काळात टीम इंडियासाठी चमत्कार दाखवू शकतो. (ipl 2022 bcci select committee might be give chance to umran malik against to south africa t 20 series)
आयपीएलनंतर रोहित शर्मा वेगवान गोलंदाज उमरान मलिकला (Umran Malik) टीम इंडियामध्ये संधी देऊ शकतो. उमरानने आयपीएल 2022 मध्ये आपल्या भेदक आणि वेगवान बॉलिंगने खळबळ उडवून दिलीय. उमरान वेगवान चेंडू फेकण्यासोबतच अचूक यॉर्कर टाकण्यासाठीही ओळखला जातो. उमरान आयपीएलच्या 15 व्या मोसमात तो मोठ्या फलंदाजांसाठी डोकेदुखी ठरलाय.
उमरान मलिकने आयपीएलच्या इतिहासातील दुसरा सर्वात वेगवान चेंडूही टाकला. सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील सामन्यादरम्यान उमरानने 157 किमी प्रतितास वेगाने चेंडू टाकला. हा बॉल आयपीएलच्या इतिहासातील दुसरा सर्वात वेगवान चेंडू होता. याशिवाय तो या मोसमातील सर्वात वेगवान चेंडूही ठरला.
टीम इंडियात गेल्या अनेक वर्षांपासून उमरानसारखा वेगाने बॉल टाकणारा गोलंदाज आलेला नाही. त्यामुळे उमरानची दक्षिण आफ्रिका विरुद्धच्या टी 20 मालिकेत निवड होऊ शकते.