IPL 2022 | राजस्थान रॉयल्सला मोठा झटका, स्टार खेळाडू दुखापतीमुळे आयपीएलमधून बाहेर

आयपीएलच्या 15 व्या मोसमाचा (IPL 2022) आजचा 12 वा दिवस आहे. या बाराव्या दिवशी राजस्थान रॉयल्सचे  (Rajsthan Royals) बारा वाजले आहेत. राजस्थानला मोठा धक्का बसला आहे.

Updated: Apr 6, 2022, 04:41 PM IST
IPL 2022 | राजस्थान रॉयल्सला मोठा झटका, स्टार खेळाडू दुखापतीमुळे आयपीएलमधून बाहेर title=

मुंबई : आयपीएलच्या 15 व्या मोसमाचा (IPL 2022) आजचा 12 वा दिवस आहे. या बाराव्या दिवशी राजस्थान रॉयल्सचे (Rajsthan Royals) बारा वाजले आहेत. राजस्थानला मोठा धक्का बसला आहे. राजस्थानचा स्टार वेगवान गोलंदाज नॅथन कुल्टर नाईल (Nathan Coulter Nile) दुखापतीमुळे या 15 व्या हंगामातून बाहेर पडला आहे. कुल्टर नाईलला हॅमस्ट्रिंग इंज्युरीमुळे (Hamstring Injury) हा मोठा निर्णय घ्यावा  लागला आहे. मात्र याबाबत अजूनही कोणती अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.  (ipl 2022 rr rajsthan royals faster bowler nathan coulter nile ruled out due to hamstring injury)

राजस्थान फ्रँचायजीने मेगा ऑक्शनमध्ये नाईलसाठी 2 कोटी मोजून आपल्या ताफ्यात घेतलं होतं. नाईलला सनरायजर्स हैदराबाद विरुद्धच्या सामन्यात ही  दुखापत झाली होती. या सामन्यात राजस्थानने हैदराबादवर 61 धावांनी विजय मिळवला होता.  या सामन्यात नाईलने 3 ओव्हरमध्ये 48 धावा लुटवल्या होत्या. 

नाईल बाहेर पडल्याने कॅप्टन संजू समॅसन आणि टीमसाठी हा मोठा धक्का समजला जात आहे. तसेच नाईलच्या जागी बदली खेळाडूचं नाव अजूनही जाहीर करण्यात आलेलं नाही.

राजस्थानने या मोसमात आतापर्यंत शानदार कामगिरी केली आहे. राजस्थानने खेळलेल्या 3 पैकी 2 सामन्यात विजय मिळवला आहे. राजस्थान पॉइंट्स टेबलमध्ये 4 गुणांसह अव्वल स्थानी विराजमान आहे.